CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य… पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात CJP म्हणजेच कोकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाने देशभराचे लक्ष वेधून घेतले होते. तब्बल महिनाभर चाललेले हे आंदोलन काही दिवसांपूर्वी संपले. मात्र, आंदोलन संपले असले तरी CJP आता शांत बसणार नसल्याचे चित्र दिसत आहे. संस्थापक अभिजित दिपके यांनी पुढील काळासाठी मोठा मास्टर प्लान तयार करण्याचे संकेत दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये CJP च्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत देशभरातील CJP च्या कोअर कमिटीचे 15 ते 20 प्रमुख सदस्य सहभागी होणार आहेत. संस्थापक अभिजित दिपके यांच्यासोबत या सदस्यांची विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे ही बैठक अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरातील घरात आयोजित करण्यात आली आहे. CJP च्या पुढील ध्येय-धोरणांबाबत तसेच भविष्यातील भूमिकेबाबत या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीनंतर CJP कडून पुढील कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Aug 02, 2026 01:35 PM
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक