AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah : W,W,W,W, जसप्रीत बुमराहचा कारनामा, 4 विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, काय केलं?

Jasprit Bumrah World Record : टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. बुमराहने या कामगिरीसह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Jasprit Bumrah : W,W,W,W, जसप्रीत बुमराहचा कारनामा, 4 विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, काय केलं?
Team India Jasprit Bumrah World RecordImage Credit source: PTI
| Updated on: Mar 09, 2026 | 2:40 AM
Share

टीम इंडियाचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा क्रिकेट विश्वातील टॉपचा बॉलर का आहे, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. क्रिकेट विश्वात यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुमराहने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियसााठी सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. बुमराहने 4 विकेट्स घेत भारताला चॅम्पियन करण्यात बॉलिगंने प्रमुख भूमिका बजावली. बुमराहला त्याने केलेल्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आलं. बुमराहने या 4 विकेट्स घेण्यासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. बुमराहने नक्की काय केलं? हे जाणून घेऊयात.

बुमराहचा महारेकॉर्ड

बुमराहने न्यूझीलंड विरुद्ध त्याच्या कोट्यातील 4 ओव्हरमध्ये 15 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स मिळवल्या. बुमराहने या हिशोबाने प्रत्येक ओव्हरमध्ये 3.8 नुसार धावा दिल्या. यावरुन बुमराहने किती चिवट बॉलिंग केली ही लक्षात येतं. बुमराहने न्यूझीलंडचा ऑलराउंडर रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेम्स निशाम आणि मॅट हेन्री यांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. बुमराहने यासह ऐतिहासिक कामगिरी केली.

बुमराह या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बुमराहच्या नाववरही फिरकीपटू वरुण चक्रवर्तीप्रमाणे 14 विकेट्सची नोंद आहे. मात्र बुमराहने वरुणच्या तुलनेत फार कमी धावा दिल्या आहेत. बुमराहने प्रत्येक ओव्हरमध्ये 6.2 इतक्या धावा दिल्या आहेत. त्यामुळे बुमराह समसमान 14 विकेट्स असूनही तो वरुणपेक्षा काही बाबतीत सरस आहे.

बुमराह 4 विकेट्सने घेण्यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याने 2 वेगवान गोलंदाजांना मागे टाकलं. बुमराह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स मिळवणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. बुमराहच्या नावावर ताज्या आकडेवारीनुसार 26 सामन्यांत 40 विकेट्सची नोंद झाली आहे. बुमराहने यासह दक्षिण आफ्रिकेचा एनरिच नॉर्खिया आणि श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा यांना मागे टाकलं. तसेच बुमराह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात 4 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला.

बुमराहला वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमधील पराभवची खंत कायम

बुमराहचा 4 विकेट्स घेतल्याने सामनावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळेस बुमराहने 2023 मधील वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाची खंत बोलून दाखवली.

“मी आधी या घरच्या मैदानात फायनल मॅच खेळलो. मात्र विजयी होऊ शकलो नाही. मात्र आज मी चॅम्पियन झालोय. या स्पर्धेआधी मी मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो”, असं बुमराह म्हणाला.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?