AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Price Hike : सर्वसामान्य लोकांना मोठा दणका, गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ, दिवाळीपूर्वीच झटका, थेट..

सरकारने पुन्हा आज 1 नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना मोठा दणका दिला. अनेक नियमात बदल करण्यात आली. ज्यामुळे खिशाला अधिक झळ बसणार आहे. त्यातच एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली.

LPG Price Hike : सर्वसामान्य लोकांना मोठा दणका, गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ, दिवाळीपूर्वीच झटका, थेट..
LPG gas
| Updated on: Nov 01, 2026 | 6:59 AM
Share

दिवाळी ऐन तोंडावर आहे, दिवाळीच्या तोंडावरच सरकारकडून सर्वसामान्य लोकांना मोठा दणका देण्यात आला. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. इराण आणि अमेरिका युद्धात भारतात सतत गॅस सिलेंडरचे दर वाढताना दिसले. आता त्यामध्येच पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली. बेंचमार्क 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 2820 रूपयांनी वाढ करण्यात आली. आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ही वाढ करण्यात आली. मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव 2764 आणि घरगुती सिलेंडरचा भाव 941.5आहे. घरगुती सिलेंडरच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही. चेन्नईमध्ये आजपासून कमर्शियल सिलेंडरचा भाव 2994.50 रूपये करण्यात आला.

ऑक्टोबर महिन्यात हाच भाव 2983 रूपये होता. गॅस 11.50 रूपयांनी महाग झाला. घरगुती सिलेंडरचा भाव 957.5 आहे. अहमदाबादमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव 2842 रूपये झाला. अगोदर हा भाव 2831.50 होता. अहमदाबादमध्येही घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या. शिलांगमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भाव 1007.50 रूपये आहे तर आता व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव 3091 रूपये झाला.

एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव वाढल्याने हॉटेल, रेस्टारंट, कॅटरिंग यासारख्या व्यावसायिकांना थेट त्याचा फटका बसणार आहे. ज्यामुळे खाण्यापिण्याच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते. 2014 ते 2026 दरम्यान सातत्याने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव वाढताना दिसत आहे. 12 वर्षात इंडियन ऑईल कॉरपोरेशनने नोव्हेंबर 2014 मध्ये 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1,449 रूपये केली होती. मात्र, नोव्हेंबर 2026 पर्यंत व्यावासायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठे बदल झाले.

जर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढला तर गॅसच्या किंमतीमध्ये वाढ होईल. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीत मोठे हल्ले होत आहेत. यासोबतच काही तेल प्रकल्पांना टार्गेट करत हल्ले करण्यात आलीत. ज्यामुळे मोठे नुकसान झाले. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती वाढताना दिसल्या. होर्मुज खाडीत तणाव वाढला की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढतात. अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट