LPG गॅस सिलेंडरवर लिहिलेल्या या आकड्यांमध्ये लपलेले आहे गुपित ! जे तुम्ही जाणून घेणे आहे गरजेचे

LPG गॅस सिलेंडरवर लिहिलेल्या या आकड्यांमध्ये लपलेले आहे गुपित ! जे तुम्ही जाणून घेणे आहे गरजेचे
Gas Cylinder

Interesting Facts: LPG गॅस सिलेंडरवर छापलेल्या कोड्सवर विशेष लक्ष दिल्यावर आपल्या निदर्शनास A, B, C, D हे इंग्रजी वर्णमालेतील लेटर दिसून येतात. त्यानंतर अंक लिहीलेले असतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 03, 2022 | 9:08 PM

एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) आपल्या दैनंदिन आवश्यक गरजांमध्ये समाविष्ट असणारी वस्तू आहे. काही दशकांपूर्वीचा विचार केला असता याच्या वापराबद्दल अनेक शंका आणि भीती उपस्थित केली जात होती. मात्र आजच्या घडीला उज्वला योजनेच्यामार्फत देशातील गरिब कुटुंबांमध्ये सुध्दा याचा वापर होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि लोक याच्या वापराबाबत अगदी कंफर्टेबल झाले आहेत. काही वेळेस विशेष परिस्थितीमध्ये सावधगिरी न बाळगल्यामुळे अनेकदा आग लागून स्फोट होण्यासारख्या घटना समोर आल्या आहेत. तर मग या सिलेंडरची सुध्दा एक्सपायरी डेट असते का?

काय तुम्ही कधी तुमच्या घरात वापरल्या जाणा-या गॅस सिलेंडरवर लिहिलेल्या आकड्यांवर लक्ष दिले आहे? तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिले तर सिलेंडरच्या वरच्या भागावर काही छापील स्वरुपातील आकडे आपल्याला पाहायला मिळतात. हे एक प्रकारचे कोड असतात ज्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिलेंडरवर प्रिंट केले जाते. या कोडमध्ये एक प्रकारे गुपित लपलेले असते आणि हेच कोड सांगतात कि सिलेंडर किती काळानंतर वापरण्यायोग्य राहणार नाही.

या कोड्सवर बारकाईने पाहिले तर त्याची सुरुवात इंग्रजी अक्षरे A, B, C, D ने होताना दिसते. यानंतर अंक छापेलेले दिसून येतात. यातील इंग्रजी लेटर्सचा संबंध वर्षाच्या १२ महिन्यांशी असतो. म्हणजेच १ महिना हा ३ महिन्यांचे प्रतिनिधित्व करत असतो. यानंतर जे अंक येतात ते सिलेंडर तयार झालेले वर्ष दाखवत असते. याप्रकारे हा कोड दाखवतो कि तुमच्या घरात असलेल्या सिलेंडरची एक्सपायरी डेट काय आहे.

A अक्षराचा वापर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांसाठी केला जातो. B अक्षरांचा वापर एप्रिल, मे आणि जून महिना दर्शवत असतो. C अक्षर जूलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिने दर्शवतात, तर D अक्षराचा वापर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांसाठी केली जाते. लेटरनंतर येणारा अंक वर्ष सांगत असतो. म्हणजे समजा एखाद्या सिलेंडरवर A.23 लिहिलेले असेल तर तो सिलेंडर वर्ष २०२३च्या पहिल्या तिमाहीत एक्सपायर होणार आहे.

ज्या प्रकारे खाण्यापिण्याच्या खाद्यपदार्थांवर एक्सपायरी डेट असते, त्याचप्रकारे या सिलेंडरची सुध्दा एक्सपायरी डेट असते. जर एखाद्या सिलेंडरवर B.25 लिहिलेले असेल तर त्याचा अर्थ असा कि तो सिलेंडर एप्रिल, मे किंवा जून महिन्यात एक्सपायर होणार आहे. मात्र त्यांची टेस्टिंग आवश्यक असते. म्हणजेच हे कोड सिलेंडरची रिक्वायर्ड टेस्टिंग डेट सुध्दा सांगत असतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें