Devendra Fadnavis | दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान
अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार होते, असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आज (1 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “अजित पवार आणि आमच्यात सातत्याने चर्चा होत असायची. जर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू असती, तर अजितदादांनी आम्हाला नक्कीच याची कल्पना दिली असती.” तसेच त्यांनी स्पष्ट केले की, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्या पक्षाचे निर्णय ते स्वतः घेत होते. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावर पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला असून, पुढे काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Published on: Feb 01, 2026 04:33 PM
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ