AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी शरद पवार मैदानात, दुष्काळात गाव विक्री काढलेल्या तुळशी ग्रामस्थांशी साधणार संवाद

Sharad Pawar visit to Tulsi: दुष्काळाची छाया गडद होत आहे. परतीच्या पावसानेही दगा दिल्याने आता शेतकरी हतबल झाला आहे. त्यांच्यासाठी शरद पवार आता मैदानात उतरले आहे. गाव विक्री काढलेल्या तुळशी ग्रामस्थांशी ते संवाद साधणार आहेत.

Sharad Pawar: शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी शरद पवार मैदानात, दुष्काळात गाव विक्री काढलेल्या तुळशी ग्रामस्थांशी साधणार संवाद
शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी शरद पवार मैदानात, दुष्काळात गाव विक्री काढलेल्या तुळशी ग्रामस्थांशी साधणार संवाद
| Updated on: Nov 01, 2026 | 6:38 AM
Share

Sharad Pawar visit to Tulsi: राज्यावरील दुष्काळाची पकड आता मजबूत होत आहे. परतीच्या पावसानेही वाकुल्या दाखवल्याने उरलेली आशाही मावळली आहे. आता काही गावं ओस पडत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्यापर्यंत दुष्काळाचे चटके ग्रामीण भागाला बसत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तुळशी ग्रामस्थांनी गावच विक्री काढले होते. दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाला आधार देण्यासाठी आता ज्येष्ठ नेते शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. उद्या ते तुळशी गावाला भेट देणार आहेत. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या आढाव्यानंतर कदाचित ते राज्य सरकारलाही काही सूचना करण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर ते धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तुळशी ग्रामस्थांशी साधणार संवाद

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते तुळशी गावाला भेट देतील. दुपारी साडेतीन वाजता शरद पवार तुळशी गावात पोहचतील. ते गावातील लोकांशी संवाद साधतील. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतील. सध्या दुष्काळाची भीषणता वाढलेली असताना बळीराजांना दिलासा देणे आवश्यक आहे. शरद पवार हे माढा तालुक्यात दुष्काळी पाहणी दौरा करणार आहेत.

तुळशी ग्रामस्थांनी लावले होते गाव विक्रीचे फलक

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांनी यावर्षी सप्टेंबर महिन्यात गाव विकणे आहे, असा फलक लावला होता. तीव्र पाणी टंचाई आणि चाऱ्याची समस्या तसेच अडचणींना कंटाळून गावकऱ्यांनी हे पाऊल टाकले होते. सीना-माढा उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून गाव पाण्यापासून वंचित राहिले आहे. गेल्या 25 वर्षांपासून दुष्काळ या गावाच्या पाचवीला पुंजल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी गाव विक्रीचे फलक लावले होते. त्याची देशभरात मोठी चर्चा झाली होती. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गावाला भेट दिली आणि मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर फलक काढून घेण्यात आले.

शरद पवार 2 आणि 3 नोव्हेंबरला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

तर शरद पवार हे 2 आणि 3 नोव्हेंबरला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असतील. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दिली. ठाकरे शिवसेना आणि आमची मैत्रीपूर्ण लढत होती. शिवसेनेने उमेदवार दिला तरी निकालानंतर सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वक्तव्य प्रतापसिंह पाटील यांनी केले. पाचपैकी तीन जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. चौथी जागाही थोड्या फरकाने गेली, त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष अधिक मजबूत होत असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होणार. 2029 चा उल्लेख करत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट