शेतकरी
देशात 60 टक्के शेतकरी आहेत. मात्र, प्रत्येक राज्यातील आणि त्या राज्यातील प्रत्येक जिल्हा, तसेच प्रांतातील शेतकऱ्यांची स्थिती एक सारखी नाहीये. प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती, त्याच्यासमोरील आव्हाने आणि समस्या वेगळ्या आहेत. कधी पावसाने दिलेली ओढ तर कधी पावसाने उडवून दिलेली दाणादाण... कधी ओला तर कधी सुका दुष्काळ यामुळे शेतकरी वर्गाचं नेहमी नुकसान होत असतं. अशावेळी सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव योजना अंमलात आणते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून ते त्यांच्या मालाला भाव देण्यापर्यंतची कामे सरकार करत असते. सध्या स्वामिनाथन आयोग लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या बजेटमध्ये या मागणीवर विचार होतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
Shetkari Andolan | हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
किसान सभा आणि मापकचे शेतकरी शेतमजुरांचा लाँग मार्च थेट मुंबईच्या दिशेने निघाला आहे. माजी आमदार जे. पी. गावीत्यांच्या नेतृत्वात मुंबईच्या दिशेने लाल वादळ कूच करत आहे. हातात लाल झेंडे, पायी चालत, राज्यसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हे वादळ मुंबईकडे येण्यास निघालं आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jan 25, 2026
- 1:41 pm
PM Kisan Yojana: बटाईदाराला लॉटरी? इतरांची शेती कसणाऱ्यांनाही पीएम किसान योजनेचा लाभ? काय सांगतो नियम?
PM Kisan Yojana Big Update: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता कधी येणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण बटाईदार आणि इतरांची शेती कसणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो का? Budget खास तरतूद होईल का?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 23, 2026
- 12:26 pm
ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या पिकावर अळीचा प्रादुर्भव
ढगाळ वातावरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील हरभरा पीक धोक्यात आले आहे . यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे . शेतकऱ्यांनी पेरलेला हरभरा पीक सध्या फूल अवस्थेत असून, फुल गळ होत आहे, तर काही ठिकाणी घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे, त्यावर किडींचा आणि अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे .
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 22, 2026
- 8:55 pm
Budget 2026:शेतकऱ्यांना लॉटरी! या बजेटमध्ये काय काय पदरात पडणार?
Budget 2026: यंदा कृषी बजट हे 1.37 लाख कोटी रुपयांहून थेट 1.5 लाख कोटी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये पीएम किसान योजना, पंतप्रधान पीक विमा योजना आणि पीएम कृषी सिंचन योजनांसाठी अधिक अर्थिक तरतूद असण्याची शक्यता आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 21, 2026
- 2:30 pm
चीन, अफगाणिस्तानवरून आयात होणाऱ्या बेदाण्याविरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा
देशांतर्गत द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. सांगलीच्या विश्रामबाग चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 20, 2026
- 9:40 pm
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नाफेडकडे पाठ, खासगी विक्री केंद्रावर गर्दी
वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात खासगी बाजारपेठेत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. भाववाढीमुळे शेतकऱ्यांनी नाफेडमध्ये माल विक्री करण्याऐवजी खासगी बाजारपेठेत सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे, नाफेडकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं पहायला मिळत आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 20, 2026
- 9:31 pm
PM Kisan Alert: नावाचं स्पेलिंग चुकले? मग 2000 रुपये उडालेच म्हणून समजा, अशी चूक दुरूस्त करा
PM Kisan Yojana Alert: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की त्याच्या खात्यात दोन हजार रुपये यावेत. पण अकदी छोट्या छोट्या चुका त्याला महागात पडतात आणि मग दोन हजारांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात काही जमा होत नाही.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 20, 2026
- 5:15 pm
PM Kisan Nidhi : फक्त एक निर्णय होताच शेतकऱ्यांना लागू शकते लॉटरी, थेट 9000 रुपये…नेमकं काय होणार?
पीएम शेतकरी सन्मान निधी अंतर्गत देशात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या आर्थिक मदतीविषयी आता शेतकरी नवी मागणी करत आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं काय घडणार हे पाहावे लागणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Jan 19, 2026
- 6:39 pm
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना लॉटरी! खात्यात येणार 4,000 रुपये? बजेटची ती मोठी वार्ता काय?
PM Kisan Yojana 22th Installment Farmer ID: पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जमा झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात दोन हजार रुपये झाले आहे. तर आता 22 व्या हप्त्याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. पण त्यापूर्वीच एक आनंदवार्ता येऊन धडकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 17, 2026
- 5:23 pm
जगाच्या पोशिंद्यावर हल्ला, अधिकाऱ्याची शेतकऱ्याला बुटाने मारहाण, व्हायरल Video ने महाराष्ट्रात खळबळ
Farmer Video : वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी शेत शिवारात धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगरूळपीर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून थेट शेतकऱ्याला बुटाने मारहाण करण्यात आली.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 14, 2026
- 6:36 pm
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 22 वा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट समोर
PM Kisan 22nd Installment Date : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजारांची आर्थिक मदत केली जाते. केंद्र सरकारने आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता 22 व्या हप्त्याच्या तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 11, 2026
- 3:30 pm
नंदुरबार जिल्ह्यात खराब हवामानामुळे रब्बीच्या पेरण्या रखडल्या
नंदुरबार जिल्ह्यात यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. परतीचा पाऊस आणि लांबलेल्या अवकाळीमुळे पेरण्यांच्या नियोजनात विस्कळीतपणा आला असून, पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी संकटात सापडले आहेत.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 7, 2026
- 9:04 pm