AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरे बापरे! या ठिकाणी चक्क विकला जातोय बर्फ, प्रत्येक नागरिक घेण्यासाठी करतोय गर्दी, नेमकं कारण काय?

चक्क रस्त्यावर ट्रकमधून होतेय बर्फ विक्री, घेण्यासाठी नागरिक करत आहेत गर्दी, नेमकं लोक कशासाठी विकत घेत आहेत बर्फ? ऐकून...

आरे बापरे! या ठिकाणी चक्क विकला जातोय बर्फ, प्रत्येक नागरिक घेण्यासाठी करतोय गर्दी, नेमकं कारण काय?
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 14, 2026 | 6:35 PM
Share

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अफगाणिस्तानमधील रस्त्यांवर ट्रकमधून बर्फ विक्री केली जात असल्याचे दिसत आहे. हा अनोखा प्रकार पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक छोटा ट्रक पूर्णपणे बर्फाने भरलेला दिसतो आहे. रस्त्याच्या कडेला काही लोक उभे असून ते त्या ट्रकमधील बर्फ खरेदी करताना दिसत आहेत. ट्रकमधील व्यक्ती प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बर्फ भरून लोकांना विकताना दिसतो आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे की आजच्या आधुनिक काळातही काही ठिकाणी बर्फ पुरवण्यासाठी अशा पारंपरिक पद्धती वापरल्या जात आहेत.

पाणी किंवा अन्नपदार्थ थंड ठेवण्यासाठी वापर

माहितीनुसार, हा बर्फ हिंदुकुश पर्वतरांगांमधून आणला जातो. पर्वतीय भागातून ट्रकमध्ये भरून हा बर्फ अशा भागांमध्ये नेला जातो, जिथे वीजेची मोठी समस्या आहे. अशा ठिकाणी अनेक घरांमध्ये फ्रिज नसल्यामुळे लोक बर्फ खरेदी करून पाणी किंवा अन्नपदार्थ थंड ठेवण्यासाठी त्याचा वापर करतात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @sciencegirl नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 16 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1.30 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून शेकडो लोकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

अफगाणिस्तानमधील का विकत घेतात बर्फ?

व्हिडिओ पाहिल्यानंतर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रश्न विचारला की लोक हा बर्फ नेमका कशासाठी वापरत असतील. तर काहींनी अफगाणिस्तानमधील लोक मर्यादित साधनांमध्येही कशाप्रकारे व्यवसायाची संधी शोधतात याचे कौतुक केले. काहींनी असेही म्हटले की उन्हाळ्यात त्या भागात खूप उष्णता असते आणि प्रत्येकाकडे फ्रिज नसल्यामुळे लोक बर्फ विकत घेऊन पाण्याच्या बाटलीत टाकतात, ज्यामुळे पिण्याचे पाणी थंड राहते.

दरम्यान, अफगाणिस्तानमधील हा व्हायरल व्हिडिओ मर्यादित संसाधनांमध्येही लोक आपल्या गरजा कशा पूर्ण करतात आणि त्यातून व्यवसायाची संधी कशी निर्माण करतात याचे एक वेगळे उदाहरण ठरत आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले