AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: 2 लाखांच्या कर्जमाफीसाठी तातडीने करा ‘ही’ नोंदणी, नाहीतर लाभ विसरून जा

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली आहे. या कर्जमाफीसाठी ही नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी केली नाहीतर शेतकर्‍यांना कर्जमाफीची सुविधा मिळणार आहे.

Farmer Loan Waiver: 2 लाखांच्या कर्जमाफीसाठी तातडीने करा 'ही' नोंदणी, नाहीतर लाभ विसरून जा
'ॲग्रीस्टॅक' ॲपवर करावी लागेल नोंदणी Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 12, 2026 | 1:39 PM
Share

Agristack App Registration: शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा केली. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना डिजिटल नोंदणी प्रक्रियेतून जावे लागेल. त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तरच शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. दोन लाखांच्यावर पीक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण त्यासाठी त्यांना अट पूर्ण करावी लागणार आहे.

‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर करावी लागेल नोंदणी

कर्जमाफी योजनेचा फायदा मिळण्यासाठी शेतकर्‍यांना डिजिटल नोंदणी करणे आवश्यक आहे. सरकारी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्‍यांना अगोदर ‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर नोंदणी करावी लागेल. सरकारी योजनेच्या लाभासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर विहित पद्धतीने नोंदणी करावी लागेल. यामध्ये शेतकर्‍यांना त्यांचे नाव, शेतजमीन, प्रकार याची माहिती द्यावी लागेल. पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेचा लाभही शेतकर्‍यांना मिळेल.पण अगोदर ही डिजिटल नोंदणी करणे आवश्यक आहे.

‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर विविध कृषी योजना, अनुदान आणि कर्जमाफीसाठी डिजिटल डेटाबेस तयार करण्यात येत आहे. या प्रणालीत शेतकर्‍यांची संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. पण अनेक शेतकर्‍यांनी अजून नोंदणी न केल्याने त्यांच्या कर्जमाफीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्जमाफी मिळणार कशी?

‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर अनेक शेतकर्‍यांना भविष्यातील कर्जमाफी आणि पंतप्रधान सन्माननिधी योजनेचा लाभासह इतर अनेक सरकारी योजनांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अचूक माहिती डिजिटल स्वरुपात नोंदवणे आवश्यक आहे. अनेक जिल्ह्यात ‘ॲग्रीस्टॅक’वरील नोंदणीसाठी शिबिर घेण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी या ‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर नोंदणी केलेली नाही. त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. बोगस लाभार्थी हुडकण्यासाठी आणि त्यांना पायबंद घालण्यासाठी ही नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर

गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार, 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफ होईल. तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. त्याचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होईल. पीक कर्ज दिलेल्या सर्व बँकांतील दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी