AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान…

| Updated on: Jul 28, 2026 | 5:25 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात महत्त्वाच्या मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. ईराण-अमेरिका तणावानंतर निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेऊन भारताची पुढील रणनीती काय असावी, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय आणि आर्थिक क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.

ईराण-अमेरिका तणावानंतर बदललेले जागतिक वातावरण, व्यापार, पुरवठा साखळी आणि अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणामांचा या बैठकीत आढावा घेतला जाऊ शकतो. विविध मंत्रालयांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालांवरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

या संकटानंतर केंद्र सरकारने सचिवांचे सात स्वतंत्र गट तयार केले होते. या गटांनी तयार केलेल्या शिफारशींचा आढावा घेऊन पुढील कृती आराखडा निश्चित करण्यावर बैठकीत भर दिला जाणार असल्याचे मानले जात आहे.

विशेषतः अर्थ मंत्रालय आणि उद्योग मंत्रालयाकडून मांडल्या जाणाऱ्या प्रस्तावांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्य, उद्योग क्षेत्राला चालना आणि पुरवठा व्यवस्थेतील अडचणी कमी करण्यासाठी आवश्यक उपायांवर विचारविनिमय होऊ शकतो.

जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था अधिक सक्षम ठेवणे आणि विकासाला गती देणारे महत्त्वाचे निर्णय पुढे नेणे, हा या बैठकीमागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे.

Published on: Jul 28, 2026 05:25 PM

Follow Us