मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं…
राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत असून शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांची बैठक मागील एक तासांपासून सुरू आहे. या बैठकीत विविध विभागांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंत्र्यांसह त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचीही मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बैठकीत मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात असल्यामुळे OSD आणि खाजगी सचिव यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी आली आहे. विविध विभागांची माहिती आणि कागदपत्रांची तयारी करण्यासाठी अधिकारी व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे.
या बैठकीत शालेय शिक्षण विभाग विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. बैठकीच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाच्या कामाचा आढावा घेतल्याची माहिती मिळाली आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे सर्व OSD आणि खाजगी सचिव या बैठकीला उपस्थित आहेत. बैठकीत विविध विषयांवर चर्चा सुरू असून पुढील निर्णयांकडे आता राजकीय वर्तुळासह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.
Published on: Jul 28, 2026 05:50 PM
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये