AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E20 चा मुद्दा पेटणार, राजधानीत पुन्हा भडका उडणार; 5 दिवसांत 3 मोठ्या आंदोलनांची घोषणा

E20 Protest : आगामी काळात दिल्ली E20 इंधनाविरोधातील आंदोलनांचे केंद्र बनणार आहे. 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान E20 विरोधात एकामागून एक मोठ्या आंदोलनांची घोषणा करण्यात आली आहे.

E20 चा मुद्दा पेटणार, राजधानीत पुन्हा भडका उडणार; 5 दिवसांत 3 मोठ्या आंदोलनांची घोषणा
E20 Fuel ProtestImage Credit source: Google
| Updated on: Jul 28, 2026 | 11:24 PM
Share

संपूर्ण देशात सध्या E20 इंधनाचा मुद्दा चर्चेत आहे, सरकारचे म्हणणे आहे की E20 हे भविष्यातील इंधन आहे. तर या मु्द्द्यावरून नेते मैदानात उतरले आहेत, विविध संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. E20 संदर्भातील वाद आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. आता आगामी काळात दिल्ली या आंदोलनांचे केंद्र बनणार आहे. 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान E20 विरोधात एकामागून एक मोठ्या आंदोलनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

31 जुलैला गाडी मार्च

सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती तहसीन पूनावाला यांनी 31 जुलै रोजी इंडिया गेट ते पार्लमेंट स्ट्रीट असा गाडी मार्च काढण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी न्यायालयात आपण इथेनॉल धोरणाशी थेट संबंधित नसल्याचे सांगितले आहे. तसेच, एका जुन्या व्हिडिओचा उल्लेख करत त्यांनी गडकरी पेट्रोल 15 रुपये प्रति लिटर मिळू शकते, असे बोलताना दिसत असल्याचे नमूद केले. त्यामुळे आता या मुद्द्यावर नागरिकांनी मोठ्या संख्येने गाडी मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

1 ऑगस्टला नॅशनल टाउनहॉल

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही E20 विषयावर नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, ज्या प्रकारे युवकांच्या एकजुटीमुळे माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, त्याचप्रमाणे E20 विषयावरही लोकांनी संघटित होऊन आपला आवाज बुलंद करायला हवा. केजरीवाल यांनी 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये नॅशनल टाउनहॉल अगेन्स्ट E20 आयोजित करण्याची घोषणा केली आहे. नागरिकांनी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून सहभागी होऊन E20 धोरणावर आपले मत मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा

E20 विरोधातील आंदोलन केवळ राजकीय पातळीवर मर्यादित राहिलेले नाही. दिल्लीतील अनेक टॅक्सी आणि परिवहन संघटनांनी 4 ऑगस्ट रोजी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या संघटनांचे म्हणणे आहे की E20 संदर्भात वाहनधारक आणि व्यावसायिक चालकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. सरकारने सर्व मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडावी आणि सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा.

E20 जनता पार्टी

E20 जनता पार्टी नावाने सुरू असलेली डिजिटल मोहीमही सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय होत आहे. हा गट स्वतःला सामान्य नागरिकांचा उपक्रम असल्याचे सांगत असून वाहनधारकांना 100 टक्के शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहे. वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ही मोहीम E20 धोरणावर सार्वजनिक चर्चा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप