AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?

पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा… नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?

| Updated on: Jul 28, 2026 | 6:17 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणाने देशभरातली झोप उडवून ठेवली होती. यामध्येच सीजेपीचे आंदोलन, मंत्र्यांच्या भेटीगाठी अशा अनेक जलद घडामोडी घडल्या. अशात आता २० जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यामध्ये परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. यावेळी काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी या घटनेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे थेट उत्तराची मागणी केली आहे.

संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी त्या आरएमएल रुग्णालयात गेल्या होत्या. त्याआधी केंद्रीय आरोग्यमंत्रीही रुग्णालयात जाऊन गेले होते. जखमी विद्यार्थिनीच्या आईने आपल्या मुलीची अवस्था पाहून तीव्र संताप व्यक्त केला. इतकेच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “पंतप्रधानांनी सिस्टममध्ये शिक्षित लोकांना जागा द्यावी”. असे म्हणत त्यांनी नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर निशाणा साधला. अखेरच्या ओळीत त्या म्हणाल्या, “पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नाही तर हृदयाचा अँगल बदलावा… त्यांनी त्यांचे सल्लागार बदलावे…”

Published on: Jul 28, 2026 06:17 PM

Follow Us