Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
उच्च न्यायालयाने पुणे जिल्हा प्रशासनाला फटकारल्यानंतर गणेशोत्सवातील ड्राय डेचा आदेश बदलण्यात आला आहे. १२ दिवसांची दारूबंदी रद्द करून आता केवळ गणेश चतुर्थी (दुपारी ४ वाजेपर्यंत) आणि अनंत चतुर्दशीला (पूर्ण दिवस) दारूबंदी लागू राहील. वाईन शॉप आणि हॉटेल असोसिएशनच्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला, सरसकट बंदीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान लागू करण्यात आलेल्या ड्राय डेच्या आदेशात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने पुणे जिल्हा प्रशासनाला दारूबंदीच्या १२ दिवसांच्या निर्णयावरून फटकारल्यानंतर आता केवळ दोनच दिवस ड्राय डे पाळला जाईल. सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे.
पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाच्या काळात १२ दिवस दारूबंदीचे आदेश काढले होते. याविरोधात वाईन शॉप असोसिएशन आणि हॉटेल असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने प्रशासनाच्या सरसकट बंदीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक मद्यपान करणारी व्यक्ती कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेलच असे नाही. तसेच सरसकट बंदीमुळे नियमित मद्यपान करणाऱ्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. केवळ पुणे जिल्ह्यातच १२ दिवसांची दारूबंदी का, असा सवालही न्यायालयाने केला.
उच्च न्यायालयाच्या या तीव्र प्रतिक्रियेनंतर सरकारी वकिलांनी आदेशात बदल करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, आता गणेश चतुर्थीला दुपारी ४ वाजेपर्यंत आणि अनंत चतुर्दशीला पूर्ण दिवस असे फक्त दोनच दिवस ड्राय डे ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Published on: Sep 11, 2026 08:24 PM
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...

