AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan चा 22 वा हप्ता नाही मिळणार? अशीच चुक तुम्ही सुद्धा केली का?

PM Kisan Yojana 22nd Installment: पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण या शेतकर्‍यांना हा हप्ता मिळणार नाही. त्यामागे एक मोठे कारण आहे. अनेक शेतकऱ्यांनी वारंवार सांगूनही या अटीची पूर्तता न केल्याने त्यांना फटका बसणार आहे.

PM Kisan चा 22 वा हप्ता नाही मिळणार? अशीच चुक तुम्ही सुद्धा केली का?
PM Kisan Samman Scheme 22th Installment Farmer
| Updated on: Mar 12, 2026 | 5:15 PM
Share

PM Kisan Yojana 22nd Installment: पीएम किसान योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा 22 वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 13 मार्च रोजी हा हप्ता जमा करण्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. पण या योजनेसाठी ई-केवायसीसोबतच फार्मर आयडी पण आवश्यक आहे. त्यामुळे हा हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आयडीची गरज आहे. त्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.जर ही अट पूर्ण केली नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा होणार नाही .

पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांमधील लोकप्रिय योजना आहे. या योजनेत वार्षिक 6 हजार रुपये थेट अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. डीबीटी अंतर्गत ही रक्कम जमा होते. वर्षाला दोन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा होतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करावी लागते. तसेच या योजनेसाठी Farmer ID ची पण गरज आहे.

उद्या जमा होणार 22 वा हप्ता

पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 21 हप्ते जमा करण्यात आले आहे. तर उद्या 13 मार्च रोजी 22 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल. तर योजनेसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना फार्मर आयडी सादर केल्याशिवाय या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. शेतकरी योजनेत बोगस लाभार्थी ओळखता यावे आणि त्यांना योजनेच्या बाहेर करता यावे यासाठी ईकेवायसी आणि फार्मर आयडीची सक्ती करण्यात आली आहे. फार्मर आयडी, शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार करणे ही सोपी पद्धत आहे. हे एक प्रकारे शेतकऱ्यांचे डिजिटल प्रोफाईल आणि ओळखपत्र आहे.

AgriStack Portal वर फार्मर आयडी तयार करा

शेतकऱ्यांना AgriStack Portal वर फार्मर आयडी तयार करता येईल. याठिकाणी युझर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. अटी आणि शर्तीसह फॉर्म सबमिट करावा लागेल. यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.तो सबमिट करुन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. फार्मर आयडीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती जतन होते. शेतकऱ्यांची जमीन कोणत्या दिशेला आहे. जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे. सध्या शेतकऱ्याच्या शेतात कोणते पीक आहे. वर्षभरात तो कोणत्या पिकाची लागवड करतो याची माहिती फार्मर आयडीत असते. त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळत असल्याची सरकारला खात्री पटेल.

शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नवीन पासवर्ड तयार करावा आणि तो सेव्ह करावा. या नवीन आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करावे. त्यानंतर Farmer Type मध्ये Owner निवडून Fetch Land Detail वर क्लिक करावे. आता जमिनीचा खासरा क्रमांक आणि जमिनीची इतर माहिती नोंदणी करावी. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीच्या कोणत्याच योजनापासून ते वंचित होणार नाहीत.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार