AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: अतिवृष्टी, पुरग्रस्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित? सरकारच्या त्या घोषणेने वाढली चिंता, कुणाला फायदा मिळणार?

Farmer Loan Waiver: फडणवीस सरकारने शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात शेतकर्‍यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेत 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. पण या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

Farmer Loan Waiver: अतिवृष्टी, पुरग्रस्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित? सरकारच्या त्या घोषणेने वाढली चिंता, कुणाला फायदा मिळणार?
हे शेतकरी वंचित राहणार?Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 08, 2026 | 8:43 AM
Share

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: राज्य शासनाने शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात. त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले. गेल्यावर्षी राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टी आणि पूराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली होती. पण ती मदत तुटपुंजी असल्याची ओरड झाली होती. विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला होता. तर आता सरकारने कर्जमाफी जाहीर करताना सप्टेंबरपासून ती लागू होणार आहे. म्हणजे त्यापूर्वी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागेल का, अशी चर्चा होत आहे. तर यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

अतिवृष्टी-पुरग्रस्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 मधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का, यावरून संभ्रम आहे. सरकारने याविषयी स्पष्ट भूमिका मांडावी अशी शेतकरी मागणी करत आहेत. अगोदर आस्मानी आणि नंतर सुलतानी संकटाने कोलमडल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे.पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहातील अशी भीती व्यक्त होत आहे. अतिवृष्टी आणि पूराने अनेक जिल्ह्यातील नदीकाठचे शेतकरी उद्धवस्त झाले. त्यांनी यापूर्वी मिळालेली मदत तुटपुंजी असल्याने नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी त्यावेळी महाराष्ट्र पिंजून काढत सरकारवर जहरी टीका केली होती. सरकारने सरसकट मदत केली नाही. त्यावरून नाराजी पसरली होती. तर आता कर्जमाफी योजनेतही या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप करण्यात आला होता.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना

बहुप्रतिक्षीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

मुख्यमंत्र्यांची काय ग्वाही?

दोन लाखांपर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेने दिलेले पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. 30 जूनपूर्वी आपण कर्जमाफी करणार आहोत. बजेटमध्ये कर्जमाफीची घोषणी केली आहे. आता पुढच्या कार्यवाहीला सुरूवात होईल. समिती यावर काम करत आहे. समिती आता याविषयीची माहिती देईल. जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.त्यामुळे पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल का हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत