AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! 15- 20 लोकं CJP प्रवक्ता सौरव दास यांच्या घरात घुसले अन् थेट.., दिल्लीतून मोठी बातमी

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीमध्ये मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. दरम्यान त्यानंतर आता सौरव दास यांच्या सोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

धक्कादायक! 15- 20 लोकं CJP प्रवक्ता सौरव दास यांच्या घरात घुसले अन् थेट.., दिल्लीतून मोठी बातमी
Sourav DasImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 05, 2026 | 6:58 PM
Share

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. आंदोलकांनी संसदेवर देखील मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं. आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले, पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. या लाठीचार्जमध्ये काही आंदोलक जखमी झाले होते. दरम्यान त्यानंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या मोर्चानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी गंभीर आरोप केला आहे.

काय आहे आरोप?

बुधवारी सकाळी 15-20 लोक आपल्या घरात घुसले, असा आरोप सीजेपीचे प्रवक्ता सौरव दास यांनी केला आहे. हा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका असल्याचं देखील सौरव दास यांनी म्हटलं आहे, त्यांनी या संदर्भात माहिती देणारा एक संदेश देखील दिल्ली पोलिसांना पाठवला आहे. सौरव दास यांच्याकडून आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ काही व्हिडीओ देखील शेअर करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर देखील एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, काही यूट्यूबर्स आणि मीडिया चॅनलच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे.

माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी धोका

सैरव दास यांनी असा आरोप केला आहे की, हे फक्त माझ्या प्रायव्हसीचं उल्लंघन नाहीये तर हा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेचा देखील विषय आहे. जर माझ्या घरावर किंवा माझ्यावर कोणी हल्ला केला तर त्याला हेच आणि असे काही लोकच जबाबदार असतील. त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टसोबत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, तसेच त्यांनी आपलं ट्विट दिल्ली पोलिसांना देखील टॅग केलं आहे. या व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे की, काही यूट्यूबर्स हे सैरव दास यांच्या घरी पोहोचले आहेत, आणि त्यांनी समोरचा दरवाजा उघडून सैरव दास यांच्या घराचं रिपोर्टिंग करण्याचा प्रयत्न केला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी