Makarand Anaspure : आरोपींचे गुन्हे इतके क्रूर असताना, त्यांना सांभाळण्याचं कारण काय? मकरंद अनासपुरे यांचा थेट प्रश्न
Makarand Anaspure : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी न्यायव्यवस्थेबद्दल मोठं वक्तव्य केलं. भारतात आरोपींचं गुन्हे इतके क्रूर असताना, त्यांना सांभाळण्याचं कारण काय? यावर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे. तर जाणून मकरंद अनासपुरे नेमकं म्हणाले तरी काय?

Makarand Anaspure : कोणता गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा कधी होणार? किती वर्ष केस कोर्टात सुरु होणार? शेवटी कोर्टाकडून दिली जाणार एकच गोष्ट आणि ती म्हणजे ‘तारीख पे तारीख…’, यावर मोठा प्रश्न उपस्थित करत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या न्यायव्यवस्थेकडून आतापर्यंत फक्त 5 आरोपींना फाशी झाली आहे, तर आपण त्या आरोपींची वागणूक इतकी क्रूर असताना त्यांना का सांभाळत आहोत? असा स्पष्ट प्रश्न मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित केला आहे. सांगायचं झालं तर, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेवर त्यांनी स्वतःचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
एका मुलाखतीत मकरंद अनासपुरे म्हणालेले, ‘निर्भयाचं प्रकरण दिल्लीमध्ये झालं होतं. आपल्या या न्यायव्यवस्थेकडून आतापर्यंत फक्त 5 जणांना शिक्षा झाली आहे. याच्यापेक्षा जास्त क्रूर वागणूक त्या आरोपींची असताना तुम्ही त्या आरोपींना फाशी का नाही देत, तुम्ही त्यांना काय म्हणून सांभाळत आहात? असा प्रश्न सामान्य नागरिक म्हणून आपल्याच पडतोच ना? मध्यंतरी दक्षिण भारतामध्ये, मला वाटतं हैदराबादमध्ये त्या बलात्काराच्या आरोपींना एन्काउंटर करुन मारुन टाकंल, ही गोष्ट नागरीक म्हणून मला फार आनंद देणारी वाटली. मला त्या पोलिसांचं देखील अभिनंदन करण्याची इच्छा आहे.
पुढे प्रश्न उपस्थित करत अभिनेते म्हणाले, ‘जी पीडिता आहे तिला तुम्ही न्याय दिला आहे का? तिला मारुन टाकलं, ती बोलत नाही म्हणून तिचं काहीच म्हणणं नसेल का? या सर्व गोष्टी आपल्या या निसर्गामध्ये जमा होतच असतील ना, मग या जमा झालेल्या गोष्टी कुठून तरी आपल्याकडे परत येणारच आहेत. एक समाज म्हणून येणार आहे… एक निसर्ग म्हणून येणार आहे… मग त्या संकटाची आपण वाट बघत बसायची का? एक मोठी नैसर्गिक आपत्ती येईल आणि मोठ्या संख्येत प्राणहानी होईल, त्याची वाट बघायची का? त्यापूर्वी आपल्या हातात जे आहे, ते आपण बदललं पाहिजे.
पुढे मकरंद अनासपुरे म्हणाले, ‘जिकता क्रूर गुन्हा आहे, तितकी क्रूर शिक्षा झालीच पाहिजे. तरच लोकांना भिती वाटेल, नाही भिती कशी वाटेल? हा मूळ प्रश्न आहे. अशा घटनेनंतर तात्काळ मोर्चे काढणारे लोक किती संतापलेले असतात. नसरापूरच्या घटनेनंतर मोर्चा काढणाऱ्यांचा किती संताप होता. छोट्याशा मुलीवर अत्याचार… त्यामुळे मला असं वाटतं की, हे कठोरात कठोर झालंच पाहिजे… नाही तर एक मोठ्या नैसर्गिक आपत्तीची आपण वाट पाहत आहोत, असंच मी म्हणेल… असं मकरंज अनासपुरे स्पष्टच म्हणाले.
