AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रमेश म्हात्रे प्रकरण ताजे असतानाच भाजपचा माजी नगरसेवकही वादात, अभिमन्यू गायकवाड यांच्याकडून प्लंबरला रॉडने मारहाण?

Kalyan BJP Abhimanyu Gaikwad: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या मारहाणीचे प्रकरणा ताजे असतानाच आता भाजपच्या माजी नगरसेवकावरही मोठा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच नवीन वाद समोर आला आहे.

रमेश म्हात्रे प्रकरण ताजे असतानाच भाजपचा माजी नगरसेवकही वादात, अभिमन्यू गायकवाड यांच्याकडून प्लंबरला रॉडने मारहाण?
भाजपचा माजी नगरसेवकही वादात, प्लंबरला रॉडने मारहाण?
| Updated on: Nov 04, 2026 | 8:29 AM
Share

Kalyan BJP Abhimanyu Gaikwad: कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेचे शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डोंबिवलीतील शास्त्रीनगर येथील शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. तर ठाण्यातील मानपाडा भागात 29 सप्टेंबर रोजी ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे ठाण्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यात अजून एका नवीन वादाची भर पडली आहे. भाजपच्या माजी नगरसेवकावर प्लंबरला रॉडने मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

थकीत पैशावरून रॉडने मारहाण

कल्याण पूर्वेत भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात थकीत पैशांवरून मोठा राडा झाला. इमारतीतील प्लंबिंगच्या कामाचे थकीत पैसे मागितल्याने भाजपचे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड आणि त्यांच्या मुलांनी रॉडने मारहाण केल्याचा प्लंबर भगवान म्हात्रे यांनी आरोप केला.तर गायकवाड यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.याप्रकरणात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अतिदक्षता विभागात उपचार

म्हात्रे यांनी इमारतीत प्लबिंगचे काम केले होते. पण गेल्या काही वर्षांपासून हे पैसे थकलेले होते. त्याची मागणी वारंवार ते करत होते. दिवाळी असल्याने त्यांनी पुन्हा पैशांची मागणी केली. ५० हजार रुपये थकले होते. ते मागण्यासाठी आपण गेलो होतो. पाच ते सहा वर्षांपूर्वी प्लबिंगचे काम त्यांच्या इमारतीत केले होते. त्याचे पेमेंट मागायला अभिमन्यू गायकवाड यांच्याकडे गेलो होतो. त्यांना पेमेंट मागितले तर त्यांनी शिवीगाळ केली. मला रॉडने मारहाण केली. त्यांनी आणि मुलांनी मला मारहाण केली, अशी माहिती भगवान म्हात्रे यांनी दिली. त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

गायकवाड यांचा म्हात्रेंवरच आरोप

तर भगवान म्हात्रे यांचे पैसे आपले चुलत भाऊ संदीप गायकवाड यांच्याकडे बाकी असून पैसे मागण्यासाठी कार्यालयात आलेल्या म्हात्रे यांनीच शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा माझी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांनी दावा केला आहे. म्हात्रे यांच्या अंगावरील जखमा जुन्या असल्याचेही ते म्हणाले. या वादात दोन्ही बाजूंचे मिळून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून याप्रकरणात पुढील तपास करण्यात येत आहे.

Follow Us
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...