AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 1st ODI सामना सुरु असताना टीम इंडियासाठी आली सर्वात मोठी गुड न्यूज, गिल-गंभीरचं टेन्शन दूर

IND vs NZ Matche: भारत न्यूझीलंड यांच्यात वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामन्याला आता सुरुवात झाली. यापूर्वी आता एक बातमी समोर आली आहे.

IND vs NZ 1st ODI सामना सुरु असताना टीम इंडियासाठी आली सर्वात मोठी गुड न्यूज, गिल-गंभीरचं टेन्शन दूर
| Updated on: Nov 04, 2026 | 8:14 AM
Share

IND vs NZ Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. पहिल्या सामन्याचे नाणेफेक भारतीय संघाने जिंकले. प्रथम गोलंजदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता सामना सुरु होण्यापूर्वीच एक आनंदाची बातमी आली आहे. या बातमीमुळे शुभमन गिल आणि गौतम गंभीर यांचे मोठे टेन्शन दूर झाले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्सने त्याला तंदुरुस्त घोषित केले आहे. बंगळूरुमध्ये गेल्या दोन दिवसांत घेण्यात आलेल्या सराव चाचण्यांनंतर, वैद्यकीय पथकाने त्याला न्यूझीलंड प्रवासासाठी परवानगी दिली आहे. तो लवकरच न्यूझीलंडमध्ये दाखल होऊन तेथे भारत ‘अ’ संघात सामील होण्याची शक्यता आहे. कृष्णा ७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम अनधिकृत कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. तो ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही.

प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल प्रसिद्धला कसोटी मालिकेसाठी एक महत्त्वाचा खेळाडू मानतात. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारत न्यूझीलंडमधील ही मालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यास उत्सुक असेल. गिल आणि गंभीर यांना एका सखोल योजनेसह सामन्याला सामोरे जायचे आहे. प्रसिद्ध हा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत अंतिम ११ खेळाडूंमध्ये तिसरा वेगवान गोलंदाज असू शकतो.

कसोटी मालिका १९ नोव्हेंबर रोजी सुरू होत असून, पहिली कसोटी वेलिंग्टन येथे खेळवली जाईल. त्यानंतर दुसरी कसोटी २७ नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे खेळवली जाईल. सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्रात भारताला अजून एकूण सात कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी दोन न्यूझीलंडविरुद्ध, तर उर्वरित पाच मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले जातील. भारतीय संघ यापैकी एकापेक्षा जास्त कसोटी सामने हरू शकत नाही. तसे झाल्यास, अंतिम फेरीत पोहोचण्याची त्यांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होईल.

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

Follow Us
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं