AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul President Election : गोकुळ संस्थेबाबत काळजी असेल तर तुमचे दोन..आता लेटर वॉर, महायुतीकडून सतेज पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर

Gokul President Election : गोकुळच्या निवडणुकीचा निकाल राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. पण काँग्रेस नेते सतेज पाटील वरचढ ठरले. आता गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अजून सुटलेला नाही.

Gokul President Election : गोकुळ संस्थेबाबत काळजी असेल तर तुमचे दोन..आता लेटर वॉर, महायुतीकडून सतेज पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर
Gokul President Election
| Updated on: Nov 04, 2026 | 8:13 AM
Share

भूषण पाटील, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अजून सुटलेला नाही. गोकुळ वरून आता सतेज पाटील आणि महायुतीमध्ये लेटर वॉर सुरु झालं आहे. गोकुळ मध्ये बहुमत डावलून सत्ता मिळवण्याचा महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याचं सतेज पाटील यांनी पत्रक काढलं होतं. संपादक आणि पत्रकारांना लोकशाही वाचवण्यासाठी पुढे यावं असं आवाहन करणाऱ्या सतेज पाटील यांच्या पत्राला महायुतीने आता प्रत्युत्तर दिलं आहे. सतेज पाटील यांचं पत्रक लोकशाही वाचवण्यासाठी कमी आणि स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक आहे. 13 संचालक निवडून आले म्हणजे जिल्ह्याचा कौल आपल्याकडे आहे असं सतेज पाटील यांनी समजू नये. गोकुळ संस्थेबाबत काळजी असेल तर तुमचे दोन संचालक महायुतीकडे देऊन महायुतीचा अध्यक्ष होऊ देणार आहात का? असा महायुतीचा सतेज पाटील यांना सवाल.

सोशल मीडियामध्ये सतेज पाटील यांच्या समर्थकांकडून चिथावणीखोर भाषा वापरली जात असल्याचा देखील पत्रात उल्लेख आहे. यापुढे चिथावणीखोर भाषा वापरल्यास जशास तसे उत्तर देऊ असं महायुतीने पत्राद्वारे इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी गोकुळची निवडणूक झाली. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या, तर महायुतीच्या पॅनलला 12 जागा मिळाल्या आहेत. दोघांमध्ये फक्त एका जागेचं अंतर आहे. आता दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी 14 जणांच्या उपस्थितीचा कोरम महत्वाचा मानला जातो. परंतु कोरम न झाल्याने गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही.

सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं प्रकरण आता कोर्टात गेलं आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचार आघाडीने थेट सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्ष निवडीला महायुतीकडून स्टे देण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यास समविचार आघाडीचं म्हणणं देखील जाणून घेतलं जावं यासाठी केलं कॅव्हेट दाखल केलं आहे.

चार शासकीय सदस्यांची निवड होऊ शकते

गोकुळमध्ये चार शासकीय सदस्यांची निवड होऊ शकते. या शासकीय सदस्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाच्या अधिकाराबाबत वटहुकूम काढला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोकुळवर समविचारी आघाडीची सत्ता येऊ नये, यासाठी महायुती प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

Follow Us
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं