AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं

कल्याणमध्ये संतापजनक घटना! ‘त्या’ एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं

| Updated on: Nov 03, 2026 | 4:51 PM
Share

कल्याणमधील वालधुनी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या वादातून एका मद्यपी पतीने पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलाच्या अंगावर उकळते मटण फेकले. पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने हे कृत्य केले. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून, पोलीस नराधम पतीवर कारवाई करत आहेत.

कल्याणमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पैशांसाठी एका बापानेच आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा आणि पत्नीचा वैरी बनल्याचे चित्र दिसत आहे. कल्याणच्या वालधुनी परिसरातील ही घटना असून, एका मद्यपी पतीने पत्नीसह पाच वर्षांच्या मुलाच्या अंगावर उकळते मटण फेकल्याचा प्रकार घडला आहे. पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने दारुड्या पतीने हे भयंकर कृत्य केले.

या हल्ल्यात पत्नी आणि चिमुकला मुलगा असे दोघेही काही प्रमाणात जखमी झाले आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अशाप्रकारे पैशांसाठी पत्नी आणि मुलावर हल्ला करणे ही गंभीर बाब असून, या नराधम पतीवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Published on: Nov 03, 2026 04:25 PM

Follow Us