सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
सह्याद्रीच्या कुशीत सध्या पावसाळी निसर्गाचे मनमोहक रूप पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आणि खंडाळा-लोणावळा परिसर दाट धुक्याने वेढला आहे.
सह्याद्रीच्या कुशीत सध्या पावसाळी निसर्गाचे मनमोहक रूप पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आणि खंडाळा-लोणावळा परिसर दाट धुक्याने वेढला आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवाईने नटला असून डोंगररांगांवर धुक्याची चादर पसरली आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पावरील दरी पुलावरून परिसराचा आढावा घेतला असता निसर्गाचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. धुक्यात हरवलेला एक्सप्रेस वे, डोंगर आणि आजूबाजूची हिरवाई पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. ड्रोनमधून टिपलेली विहंगम दृश्येही सोशल मीडियावर आकर्षण ठरत आहेत.
थंडगार वातावरण, धुक्याने झाकलेले रस्ते आणि हिरवाईमुळे परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी हा परिसर सध्या खास आकर्षण ठरत आहे.
Published on: Aug 05, 2026 07:08 PM
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...

