AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी…

| Updated on: Nov 04, 2026 | 10:30 AM
Share

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वातावरणातील बदलामुळे उद्भवलेल्या कफ आणि अशक्तपणामुळे ते दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची प्रकृती आता स्थिर असून, डॉक्टरांनी त्यांना आठ ते दहा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज (सोमवारी) पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. वातावरणातील बदलामुळे त्यांना कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून, त्यांना सध्या कोणतीही गंभीर समस्या नसल्याचे स्पष्ट केले आहे.

डिस्चार्जनंतर शरद पवार मुंबईतील त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन आराम करतील. डॉक्टरांनी त्यांना पुढील आठ ते दहा दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या काळात शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच एक्स (पूर्वीचे ट्विटर) द्वारे शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल चिंता न करण्याचे आवाहन केले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आणि काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Published on: Nov 04, 2026 10:30 AM

Follow Us