राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
सातारा जिल्ह्यातील तासवडे-आनेवाडी येथे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पुणे-बंगळूर महामार्ग अडवला आहे. उसाला ४५०० रुपये पहिली उचल मिळावी आणि इथेनॉलचा दर ७० रुपये करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. साखर दरात वाढ झाल्याने कारखानदारांना ही उचल देणे शक्य असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राजू शेट्टींच्या आदेशानुसार पुणे-बंगळूर महामार्ग अडवून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. उसाला प्रति टन 4500 रुपये पहिली उचल मिळावी आणि इथेनॉलचा खरेदी दर ५७.९८ रुपयांवरून 70 रुपये प्रति लीटर करावा, अशा प्रमुख मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, राज्य सहकारी बँकेने साखरेच्या प्रति क्विंटल दरात 42 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांना आता 4500 रुपये पहिली उचल देणे आर्थिकदृष्ट्या शक्य झाले आहे.
कारखानदार मात्र सर्वपक्षीय एकजूट करून शेतकऱ्यांना योग्य दर देण्यापासून टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दुपारपासून महामार्ग अडवण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ मध्यस्थी करून या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. कोल्हापूर येथे सुरू असलेले आंदोलन संपेपर्यंत सातारा येथील शेतकरी मागे हटणार नाहीत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
Published on: Nov 04, 2026 10:40 AM
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक

