भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता… संजय राऊत आक्रमक
संजय राऊत यांनी गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावरून सरकारवर लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप केला आहे. बहुमताचा अनादर करत चार संचालक लादण्याचा प्रयत्न, गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा डाव आणि शेतकऱ्यांच्या मतांना तुडवणे हे लोकशाहीविरोधी आहे. ही शंडगिरी असून महाराष्ट्राची जनता अशा कृतींचा धिक्कार करेल, असे राऊत म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारवर आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, सरकार बहुमत असलेल्या समविचारी पॅनेलला अध्यक्ष निवडून देऊ देत नाहीये आणि नवीन नियम आणून चार संचालक घुसडून गोकुळ संघ ताब्यात घेण्याचा इरादा ठेवत आहे. हा लोकशाहीविरोधी डाव असून यामागे गोकुळ अमूलला विकण्याचा कट असल्याचे राऊत यांनी म्हटले. राऊत यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना थेट उद्देशून म्हटले की, “भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात जो तिरस्कार निर्माण झालेला आहे, तो अशाच घटनांमुळे. हे मी अमित शहांना सांगू इच्छितो. त्यांनी स्वतःकडे सहकार मंत्रालय का घेतले आहे? या चोऱ्यामाऱ्या करण्यासाठी, महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या ताब्यात घेण्यासाठी.” त्यांनी पुढे म्हटले की, “गोकुळ हे अमूलला विकायचे आहे या सगळ्यांना मिळून, आणि तो डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला.”
Published on: Nov 04, 2026 12:05 PM
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज

