संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा…
काँग्रेसने राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्र्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडिया' म्हटल्यामुळे मोठा वाद सुरू आहे.
काँग्रेसने राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्र्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हटल्यामुळे मोठा वाद सुरू आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत घुसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्षाला धारेवर धरत शिवसेना (उबाठा) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलं की, याच जागी फडणवीस किंवा शिंदे असते तर त्यांना ‘गुंगा गुंडा’ सांगितलं असतं. यावर आता अमृता फडणवीस चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी राऊतांना खडे बोल सुनावले.
अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार करताना म्हटले आहे की, विनाकारण काहीही बरळण्यापेक्षा किंवा राऊतांसारखं वायफळ बोलण्यापेक्षा गप्प (गुंगं) असलेलं बरं. राजकीय टोला लगावत त्यांनी स्पष्ट केले की, विरोधी पक्षनेते किंवा नेतेमंडळींनी अभ्यास न करता निरर्थक टीका करणे योग्य नाही. याआधीही अमृता फडणवीस यांनी विविध विषयांवर परखड मते मांडली आहेत.
Published on: Aug 05, 2026 06:55 PM
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी

