मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Facebook वरील व्हिडीओ हटवण्याच्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकार आणि Meta कंपनीच्या टीममध्ये याबाबत महत्त्वाची बैठक झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Facebook वरील व्हिडीओ हटवण्याच्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकार आणि Meta कंपनीच्या टीममध्ये याबाबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने व्हिडीओ हटवल्याच्या प्रकारावर Meta ला फटकारले. त्यानंतर कंपनीकडून या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत माफी मागण्यात आली.
दिल्लीतील NEET पेपर लीक प्रकरणावर Gen Z कडून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनासंदर्भातील एक व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Facebook वर शेअर केला होता. मात्र, काही काळानंतर हा व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर भारत सरकार आणि Meta च्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत CSAM (बाल शोषण कंटेंट), डीपफेक कंटेंट आणि पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या प्रकरणात प्लॅटफॉर्मच्या टीमकडून गंभीर चूक झाली असून त्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला. तसेच माफीही मागण्यात आली.
भारतामध्ये कोट्यवधी युझर्स असल्याने कंटेंट मॉडरेशनमध्ये मनमानी पद्धत स्वीकारली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले.
Published on: Aug 05, 2026 05:59 PM
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...

