शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच…
शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर आता शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. या सुनावणीनंतर आता शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे.
आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह यासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सविस्तर युक्तिवाद झाला. आता उद्या या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर राहुल शेवाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच कोर्टातून बाहेर पडताना संजय राऊत यांनी दाखवलेल्या व्हिक्ट्री साईनवरही त्यांनी भाष्य केलं. राहुल शेवाळे म्हणाले, “दावा कोणीही करेल, परंतु निर्णय देण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आहे. त्यामुळे खरं तर असा दावा करता येत नाही, कारण तो सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होईल. त्यामुळे असा दावा करता येत नाही.”
पुढे ते म्हणाले, “परंतु आम्हाला विश्वास आहे, आम्ही जी काही प्रक्रिया केली आहे, ती सर्व प्रक्रिया ही घटनेला अनुसरून केली आहे. त्यामुळे आम्हाला संपूर्ण विश्वास आहे, विश्वास असणं महत्त्वाचं आहे. दावा कोणालाही करता येत नाही.”
Published on: Aug 05, 2026 06:17 PM
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?

