AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी आनंदवार्ता! शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रिम रक्कम लवकरच, लाभार्थ्यांची यादी सुद्धा धडकली, या दिवशी खात्यात जमा होणार मदत

Drought Relief Advance Aid Farmers: राज्यातील 1.5 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता धडकली आहे. 5 हजारांची अग्रिम रक्कम या दिवशी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. लाभार्थ्यांची यादी सुद्धा धडकली आहे. आताच दोन हजारांचा पीएम किसानचा हप्ता आणि आता अग्रिम रक्कम जमा होणार आहे.

मोठी आनंदवार्ता! शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रिम रक्कम लवकरच, लाभार्थ्यांची यादी सुद्धा धडकली, या दिवशी खात्यात जमा होणार मदत
मोठी आनंदवार्ता! शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रिम रक्कम लवकरच, लाभार्थ्यांची यादी सुद्धा धडकली, या दिवशी खात्यात जमा होणार मदत
| Updated on: Oct 31, 2026 | 11:57 AM
Share

Drought Relief Advance Aid Farmers: दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता धडकली आहे. राज्यातील 304 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यातील 1.5 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आली आहे. 5 हजारांची अग्रिम रक्कम या दिवशी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. लाभार्थ्यांची यादी सुद्धा तहसील कार्यालयात दाखल झाली आहे. काल 30 ऑक्टोबर रोजी 2,000 रुपयांचा पीएम किसानचा हप्ता जमा झाला. आता अग्रिम रक्कम जमा होणार आहे.

थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम

राज्यातील 304 तालुक्यात फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अग्रिम मदत निधी जमा करण्यात येणार आहे. 5 हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण(DBT) द्वारे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील 1 कोटी 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. आधारशी जोडणी केलेल्या बँक खात्यात मदत निधी जमा होईल.

नोव्हेबरच्या पहिल्याच आठवड्यात अग्रिम रक्कम

पावसाने ओढ दिल्याने राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पिकांचे नुकसान झालेले आहे. राज्य सरकारने 1.50 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय घेतल्यानंतर आता पात्र शेतकऱ्यांची यादी तहसील कार्यालयात दाखल झाली आहे. या यादीची पडताळणीही सुरू झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 2 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम रक्कम वाटप करण्यास सुरूवात होणार आहे.

7500 कोटींच्या निधीला मंजूरी

ज्या शेतकर्‍यांना खरीप हंगामात 33 टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यांना 5000 रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने 7500 कोटींच्या निधीला मंजूरी दिली आहे. ही अंतिम नुकसान भरपाई रक्कम नाही. ही केवळ अग्रिम भरपाई रक्कम आहे. ही एक तातडीची प्राथमिक मदत आहे. काही दिवसानंतर NDRF च्या निकषानुसार उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्य सरकार 5,000 रुपयांची अग्रिम मदत देत आहे. 2 नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यात येणार आहे.

अग्रिम मदतीतून यांना वगळले

राज्य सरकारने दु्ष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करताना काही निकष लागू केले आहेत. त्यानुसार ही मदत गरजू आणि बाधित शेतकऱ्यांनाच मिळावी यासाठी काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यात येणार आहे. त्यानुसार, या व्यक्तींना मदत मिळणार नाही.

शेती आणि बाह्य उत्पनातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती

केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी ज्यांचे वेतन 25,000 रुपयांपेक्षा अधिक आहे

लोकप्रतिनिधी, निवृत्तीवेतनधारक (25,000 रुपयांपेक्षा अधिक पेन्शन घेणारे)

सहकारी संस्थांचे उच्च पदस्थ अधिकारी

Follow Us
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?