AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वीच मिळणार 5000 रुपये, पण अगोदर आजच करा हे काम

Maharashtra Farmer Relief Fund: महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा जवळपास 1.5 कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. पण त्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वीच मिळणार 5000 रुपये, पण अगोदर आजच करा हे काम
शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वीच मिळणार 5000 रुपये, आजच करा हे काम
| Updated on: Oct 29, 2026 | 12:49 PM
Share

Maharashtra Farmer Relief Fund : महाराष्ट्रात यंदा कमकुवत मान्सूनमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आणि समस्या आहेत. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 5000-5000 रुपये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने 7500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्यातील जवळपास 1.5 कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पण जर ई-केवायसी अथवा बँकेशी संबंधित काही माहिती अपूर्ण असेल, तर शेतकऱ्यांना हा मदतनिधी मिळण्यास अडचण येऊ शकते. अशावेळी शेतकऱ्यांना वेळेतच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 5000 रुपये?

राज्यातील 304 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. या परिसरातील ज्या शेतकर्‍यांना खरीप हंगामात 33 टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यांना 5000 रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली आहे. ही रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. पण ई-केवायसी आणि इतर प्रक्रिया रखडली असेल तर ती पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

ई-केवायसीविषयी काय नियम?

सरकारने शेतकऱ्यांची अडचण कमी करण्यासाठी ई-केवायसीचा नियम सोपा केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजीनंतर कोणत्याही सरकारी योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, त्यांना ही प्रक्रिया पुन्हा करण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांनी ती लवकर पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

Farmer ID नसेल तर काय होणार?

सरकारने वन अधिकारातंर्गत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा व्यवस्था केली आहे. अशा शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर त्यांना ई-केवायसीच्या आधारे मदत मिळू शकते. इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा फार्मर आयडी आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.

खात्यात केव्हा येणार पैसा?

सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे देण्याचे निश्चित केले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच दिवसात रक्कम पोहचेल. याविषयीची कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाही. पाच हजारांची अग्रिम मदत सध्या देण्यात येणार आहे. पिकाच्या नुकसानीचा सर्व्हे पूर्ण झाल्यावर उर्वरीत रक्कम देण्यात येणार आहे.

Follow Us
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा पलटवार
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
Anand Paranjpe : भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा; आनंद परांजपेंचा पलटवार
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
Navnath Ban : रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? नवनाथ बन यांचा थेट सवाल
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
Navnath Ban : पुणे पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी; एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला