AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Mahajan: रागाच्या भरात एक्स गर्लफ्रेंडसोबत काय करायचा राहुल महाजन? अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Rahul Mahajan: राहुल महाजन याने तीन लग्न केली आणि तिन्ही नात्यात त्याला अपयश आलं. पण गर्लफ्रेंड्ससोबत देखील राहुल यांचं नातं वादग्रस्त ठरलं. एक्स गर्लफ्रेंडने राहुल याच्यावर गंभीर आरोप केलेल...

Rahul Mahajan: रागाच्या भरात एक्स गर्लफ्रेंडसोबत काय करायचा राहुल महाजन? अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Rahul Mahajan
| Updated on: Oct 29, 2026 | 1:14 PM
Share

Rahul Mahajan: रिएलिटी शो स्टार राहुल महाजन आता कोणत्या शोमुळे नाही तर, त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. राहुल महाजन यांनी एक दोन नाही तब्बल तीन लग्न केली. पण राहुल याचं कोणतंच लग्न फार काळ टिकलं नाही. राहुल याचं पहिलं लग्न श्वेता सिंहसोबत झालं. 2006 मध्ये दोघांनी लग्न केलं आणि 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2010 मध्ये राहुर याने डिंपी गांगुली हिच्यासोबत लग्न केलं. पण 5 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर राहुल याने तिसरं लग्न कझाकिस्तान मॉडेल नताल्या इलिनासोबत लग्न केलं. पण त्याचं तिसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी 2023 मध्ये घटस्फोटाचा निर्णय घेतला. सांगायचं झालं तर, राहुल याच्यावर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आले.

तीन लग्न करण्यापूर्वी राहुल याच्या नावाची चर्चा अनेक अभिनेत्रींसोबत देखील रंगली. अशात अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे पायल रोहतगी… पायल हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने 2022 मध्ये रेसलर संग्राम सिंग याच्यासोबत लग्न केलं. हे जोडपं त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील वादविवादांमुळे अनेकदा चर्चेत असतं. पायल हिने स्वतः त्यांच्यातील एका वादाचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता, जो चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. संग्रामशी लग्न करण्यापूर्वी, पायल राहुल महाजनसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

पायलने राहुलवर लावले गंभीर आरोप

पायल हिने राहुल याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मारहाण करत असल्याचे आरोप पायल हिने राहुल याच्यवर लावले. ‘बिग बॉस 2’ नंतर राहुल आणि पायल यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा देखील सर्वत्र रंगली. पायल हिने राहुल याच्यावर सतत संतापत असल्याचे आरोप केले, याच कारणामुळे दोघांच्यान नात्याचा वाईट अंत झाला.

एका मुलाखतीत पायल म्हणालेली, ‘राहुल याने मला दोन वेळा मारलं… एकदा तर माझं डोकं दरवाजावर आपटलं… जेव्हा राहुल रागात असायचा, तेव्हा त्याचं स्वतःवर नियंत्रण नसायचं.’, एवढंच नाही तर, राहुल महाजन याचं लग्न डिंपी गांगुली हिच्याशी झालेला. डिंपी हिने राहुल याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केले आणि त्यानंतर त्याना घटस्फोट दिला होता.

याबद्दल बोलताना पायल म्हणालेली, “एका मुलाखतीत जेव्हा मी डिंपी आणि राहुल यांचा उल्लेख केला, तेव्हा डिंपी हिने सर्व काही नाकारलं आणि त्यांच्यात सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी अशी बातमी समोर आली की राहुल डिंपी हिला देखील मारहाण करायचा.’, आता देखील राहुल त्याच्या खासगी आयुष्यामुळेच चर्चेत आहे.

Follow Us
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
Anand Paranjpe : भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा; आनंद परांजपेंचा पलटवार
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
Navnath Ban : रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? नवनाथ बन यांचा थेट सवाल
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
Navnath Ban : पुणे पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी; एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?