AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा ट्विस्ट, अब्दुल सत्तार यांच्या विधानाने डोळेच फिरले, म्हणाले, तुमचा पराभव…

सत्ताधारी असूनही जेव्हा युतीतील कोणी तरी अधिकृतपणे विरोधात काम करत असेल तर त्याचा शोध घेतला पाहिजे. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काही ना काही कारण असेलच. मी पाचवेळचा आमदार आहे. अनेक वर्षापासून जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे माझ्यावर ही वेळ का येते? याचा विचार झाला पाहिजे, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

मोठा ट्विस्ट, अब्दुल सत्तार यांच्या विधानाने डोळेच फिरले, म्हणाले, तुमचा पराभव...
abdul sattarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 1:01 PM
Share

छत्रपती संभाजी नगरमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पराभव झाला आहे. या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिंदे सेनेचे नेते बलाढ्य नेते अब्दुल सत्तार यांनी शरद पवारांच्या उमेदवाराचा उघड प्रचार केल्याने सतीश चव्हाण यांचा पराभव झाल्याचा आरोप महायुतीतून केला जात आहे. त्यावर अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी आधीपासूनच विरोध केला होता. माझा विरोध उघड होता. त्यावेळी कुणी काही बोललं नाही. आताच पराभवांचं खापर का फोडलं जातंय? असा सवाल सत्तार यांनी केला आहे. तसेच सतीश चव्हाण यांचा पराभव राष्ट्रवादीतील नेत्यांमुळेच झाल्याचा दावाही सत्तार यांनी केला आहे. सत्तार यांच्या या डोळे फिरवणाऱ्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिंदे सेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट राष्ट्रवादीवरच आरोप केला आहे. मी तर पहिल्यापासून डायरेक्ट विरोधात उतरलो होतो. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मी युतीचा धर्म पाळला होता. वरिष्ठांच्या आदेशाचं मी पालन केलं होतं. त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आला होता. याची माहिती बन यांनी घ्यावी. मला बन आणि भणभण काही माहीत नाही. बन यांना मी कधी पाहिलं नाही. त्यांना माझ्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्या उमेदवाराला तेव्हा मी निवडून आणलं आहे. दोन महिन्याआधीच ही निवडणूक झाली होती. त्यावेळी मी युतीचा धर्म पाळला होता. माझ्या विरोधात बोलण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी सतीश चव्हाण यांना का पाडलं? याची माहिती घ्या, असा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

18 वर्षाचं साम्राज्य संपवलं

मतदानाच्या दिवशी मी अनेक मतदान केंद्रावर भेटी दिल्या होत्या. तेव्हा तुमची भूमिका बदलली का? असा सवाल मला पत्रकारांनी विचारलं होतं. मी नाही म्हटलं. प्रतापसिंह पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयात माझा खारीचा वाटा आहे. सतीश चव्हाण किती घातक आहे, हे आम्ही सांगितलं. चव्हाणांसाठी गेली 18 आम्ही मते मागितली. पण या काळात चव्हाण यांचं रुप बदललं आहे. त्यांच्या विरोधात नाराजी होती. आम्ही त्यांच्या विरोधात डायरेक्ट उतरलो. लपून छपून प्रचार केला नाही. त्यांचं 18 वर्षाचं साम्राज्य संपवलं. प्रत्येक मतदारांनी त्यांच्याविरोधात मतदान केलं. सतीश चव्हाण यांनी काहीच काम केलं नव्हतं. त्याचं त्यांना बक्षीस मिळालं, असा टोला त्यांनी लगावला.

कुणाच्या तरी डोक्यावर…

नागपूरमध्ये आम्ही भाजपला सहकार्य केलं होतं. पण पडल्यानंतर कुणाच्या तरी डोक्यावर खापर फोडावं लागतं. तेच भाजपने केलं आहे. संभाजीनगरात शिवसेनेच्या नेत्यांनी, पालकमंत्री, आमदार, खासदारांनी सतीश चव्हाणचं काम केलं. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलं नाही. मी का काम केलं नाही, याची उत्तरं आम्ही आमच्या नेतृत्त्वाला देऊ, असंही त्यांनी सांगितलं. सतीश चव्हाण यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार दिला असता तर वेगळा निकाल लागला असता, असंही ते म्हणाले.

Follow Us
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
Anand Paranjpe : भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा; आनंद परांजपेंचा पलटवार
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
Navnath Ban : रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? नवनाथ बन यांचा थेट सवाल
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
Navnath Ban : पुणे पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी; एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय