AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप- शिंदे गटात संघर्ष पेटला! निकालानंतर रविंद्र धंगेकरांनी मित्रपक्ष भाजपवर तोफ डागली, म्हणाले, खंडणीखोर कुटुंबाच्या…

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर भाजप- शिंदे गटात संघर्ष पेटल्याचं समोर आलं आहे. निकालानंतर रविंद्र धंगेकरांनी मित्रपक्ष भाजपवर तोफ डागली आहे. म्हणाले, खंडणीखोर कुटुंबाच्या...

भाजप- शिंदे गटात संघर्ष पेटला! निकालानंतर रविंद्र धंगेकरांनी मित्रपक्ष भाजपवर तोफ डागली, म्हणाले, खंडणीखोर कुटुंबाच्या...
ravindra dhangekarImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 12:47 PM
Share

राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. महायुतीचे 3 उमेदवारांना पराभवाला सामारे जावं लागलं. पुण्यातील शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाने भाजप विरोधात उघडपणे बंडखोरी केल्याचे दिसून आलं. शिंदे गटाने पुणे शिक्षक मतदारसंघात उमेदवार दिला होता. त्यानंतरही भाजपचा उमेदवार निवडून आला. परंतु पुणे पदवीधरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवाचं खापर भाजपने शिंदे गटावर फोडलं. यावरून भाजप-शिंदे गटात संघर्ष पेटला आहे. भाजपच्या आरोपांना शिंदे गटाच्या रविंद्र धंगेकर यांनी भाजपच्या नवनाथ बन यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

शिंदे गटाचे रविंद्र धंगेकर म्हणाले, ‘भाजपला बाजूला केलं तर नवनाथ बन यांना कोण ओळखतं? बन यांचा इतिहास काय आहे. मी लपून केलेलं नाही. आम्ही आमची भूमिका खुल्यापणाने मांडली होती. ज्यांना तुम्ही उमेदवारी दिली, तो भाजपचा सभासद तरी आहे का? तुम्ही अचानक आणलेला उमेदवार  आहे. तुम्ही आणलेला देव आणि आम्ही आणलेला राक्षस…बन, तुम्ही याआधी बोलायला पाहिजे होते. निकालानंतर तुमची तळमळ समजून घेऊ शकतो. तुम्ही धंगेकर यांना कोणी विचारत नाही, असं बोलता. परंतु तुम्हाला धंगेकरांवर बोलायची वेळ आली आहे. या लोकशाहीत इंदिरा गांधी, विलासराव देशमुख, अटल बिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला आहे’.

‘धंगेकरांना कोण विचारतं, हे माहीत आहे. तुम्हाला कोण विचारतं, हे देखील आम्हाला माहिती आहे. भाजपमधून काढलं तर लोकांच्या दारात फिरावं लागेल. हा फरक आहे. तुम्ही जबाबदारीने बोला. महाराष्ट्रात तुमच्याविषयी चांगलं बोलत नाही. तुमचं कवच निघालं तर लोक रस्त्यात उतरून जाब विचारतील. हा सोपा विषय नाही.  बन ही भाजपने कामावर ठेवलेली व्यक्ती आहे. तुम्ही आयुष्यात तोंडाने बोलला. तुम्ही समाजसेवा केली नाही. फक्त कमळाच्या चिन्हावर राजकारण करता. निवडणुकीआधी बोलायला पाहिजे होते. खंडणीखोर कुटुंबाच्या उमेदवाराने वर्षानुवर्षे या देशात पत्रकारितेच्या नावाखाली खिसे लुटले. त्याला उमेदवारी दिल्यावर आमच्यासारखा कार्यकर्ता हेच बोलणार आहे. आज, उद्या आणि परवाही बोलणार. हे लपून राहिलं नाही. मी कोणाच्या मेहरबानीवर नाही. मला कोणी घेतलं पाहिजे, कोणी काढलं पाहिजे. याची जबाबदारी मीच घेतली आहे. लोकशाहीत पराभव होतोच. तुमच्या नेतृत्वाला सल्ला द्यावा. तुमचं नेतृत्व किंमत कमी करत असाल. हेटाळणी करत असाल. तर तुमचे दिवस हेच येणार आहे, असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला.

Follow Us
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
Navnath Ban : रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? नवनाथ बन यांचा थेट सवाल
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
Navnath Ban : पुणे पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी; एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित