AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Dhangekar vs BJP : धंगेकरांना पुण्यात कोण विचारतो, ते बारा..धंगेकर vs भाजप, हरल्यानंतर सामना सुरु

Ravindra Dhangekar vs BJP : "16 हजार पदवीधरांची मत कमी पडली. सानप यांना जी मत मिळाली, ती स्मिता जाधव यांना 16 हजार मत मिळाली असती तर निकाल वेगळा लागला असता. धंगेकरांनी भाजपच्या विरोधात असलेल्या उमेदवाराचा प्रचार केला नसता, शिंदे यांनी त्यांना समज द्यायला हवी होती"

Ravindra Dhangekar vs BJP : धंगेकरांना पुण्यात कोण विचारतो, ते बारा..धंगेकर vs  भाजप, हरल्यानंतर सामना सुरु
Ravindra Dhangekar vs BJP
| Updated on: Oct 29, 2026 | 12:39 PM
Share

“पुण्यामध्ये शिवसेनेने ऐनवेळी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला. मंगेश चिवटे हे आधी त्यांचे अधिकृत उमेदवार होते. त्यांना एबी फॉर्म दिलेला. तो त्यांनी मागे घेतला. आम्हाला वाटलेलं भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एकदिलाने काम करु. आम्ही एकत्र काम केलं असतं तर भाजप, महायुतीचा पराभव कोणी करु शकलं नसतं. सचिन सानप यांना 16 हजार मत मिळाली. ही 16 हजार मत ट्रान्फसर झाली असती तर आमचा उमेदवार शिक्षकमध्ये पहिल्याच फेरीत जिंकला असता” असं भाजपं प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले. “नुसतं हे म्हणणं नाही, त्याचे पुरावे सुद्धा आहेत. रवींद्र धंगेकर यांचं अधिकृत इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट पाहिलं तर त्यांनी पोस्टमध्ये काय लिहिलय स्मिता जाधव यांना मतदान करु नका. खाली काय आहे शिवसेना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर. शिक्षकसाठी वेगळा उमेदवार दिला होता, तिथे एकवेळ गृहित धरलं असतं” असं बन म्हणाले.

“पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेचा उमेदवार नव्हता. पदवीधरमध्ये पाठिंबा देणं अपेक्षित होतं. रवींद्र धंगेकर यांनी एकापाठोपाठ एक तीन पोस्ट केल्या. वरती जिंकल्यावर शाब्बास पदवीधरांनो योगेश जाधव आता तरी तुम्ही बोध घेणार का?. हे कोण म्हणतय शिवसेनेचे अधिकृत महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर. आमचा रवींद्र धंगेकरांशी वाद नाही. आमचा एकनाथ शिंदे यांना सवाल आहे, तुम्ही कारवाई करणार आहात का?. अमरावतीत देखील असाच प्रकार भाजपच्या काही बंडखोरांनी केला. अशा बंडखोरांना सहावर्षांसाठी निलंबित करण्याची भूमिका भाजपने घेतली. आमचा एकनाथ शिंदे यांना सवाल आहे की, ते अशी भूमिका घेणार आहेत का?. योग्य ती कारवाई करणार का? ते सक्षम नेते आहेत” असं नवनाथ बन म्हणाले.

..तर ही वेळ आली नसती?

“मतदानाच्या आधी समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला नाही असं नाही. प्रयत्न झाला. आम्ही, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार एकत्र असतो तर पाचही जागा जिंकू शकलो असतो. 16 हजार पदवीधरांची मत कमी पडली. सानप यांना जी मत मिळाली, ती स्मिता जाधव यांना 16 हजार मत मिळाली असती तर निकाल वेगळा लागला असता. धंगेकरांनी भाजपच्या विरोधात असलेल्या उमेदवाराचा प्रचार केला नसता, शिंदे यांनी त्यांना समज दिली असती तर ही वेळ आली नसती. ऐनवेळी तुम्ही मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. सचिन सानप यांना पाठिंबा दिला यामागचा हेतू लक्षात येत नाही. याचा खुलासा वरिष्ठ पातळीवर झाला पाहिजे” असं नवनाथ बन म्हणाले.

धंगेकरांना व्यक्तिगत कोण विचारतो?

“धंगेकरांना व्यक्तिगत कोण विचारतो, ते बारा पक्ष फिरुन आलेले आहेत. मनसे, काँग्रेस, त्यांच्या व्यक्तिगत म्हणण्याला कोण विचारत नाही. त्यांना पुण्यामध्ये कोण विचारत नाही. त्यांनी शिवसेना महानगरप्रमुख लिहिलय म्हणून त्यांच्या पोस्टला किंमत आहे” असं नवनाथ बन यांनी सांगितलं.

Follow Us
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
Navnath Ban : रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? नवनाथ बन यांचा थेट सवाल
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
Navnath Ban : पुणे पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी; एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित