सेंट झेवियर्स मास कम्युनिकेशनमधून पत्रकारितेचा डिप्लोमा. गेल्या 23 वर्षापासून पत्रकारितेत आहेत. दैनिक ‘संध्याकाळ’, ‘लोकनायक’, ‘सम्राट’, ‘सामना’त उपसंपादक आणि ‘महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम’मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम पाहिले आहे. दैनिक ‘सामना’साठी 6 वर्ष मुंबई महापालिकेचं वार्तांकन. ‘सामना’साठी मुंबई आणि नागपूर अधिवेशन आणि शिवसेनेचंही वार्तांकन. नागरी, वंचित समूहाच्या समस्या आणि राजकीय बातमीदारीवर अधिक भर. ‘आंबेडकरी कलावंत’ या पुस्तकाचे लेखक. सप्टेंबर 2020पासून ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये कार्यरत.
महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार? नवे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?; महापौरपदाबाबतही मोठं विधान
हिंदीबाबतचा संभ्रम कुणात नाही. फक्त राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संभ्रम आहे. त्यांचा संभ्रम दूर करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. पण त्यांनी हा मुद्दा निवडणुकीचा केला असेल तर त्याला काही करू शकत नाही. वाहिन्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. एखादा मुद्दा कितीवेळ चालवावा यासाठी समिती स्थापन केली आहे. समिती या संदर्भातील अभ्यास करून अहवाल तयार करणार आहे. विधानसभेत तो पाठवेल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
- भीमराव गवळी
- Updated on: Jul 12, 2025
- 1:51 pm
दूर दूरना भूतकाळमां हूं… थेट त्रिनिदाद- टोबॅगोच्या पंतप्रधानांनी वाचली मोदींची कविता; कशाबद्दल मानले धन्यवाद?
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुजराती कविता वाचून दाखवली. मोदींच्या नेतृत्वाचं आणि कोव्हिड लसीच्या मदतीचं कौतुक करत त्यांनी मोदींचा सत्कार केला. मोदींच्या दूरदर्शी धोरणांमुळे जगभरातील भारतीयांना अभिमान वाटतो, असंही त्या म्हणाल्या.
- भीमराव गवळी
- Updated on: Jul 4, 2025
- 10:58 am
शिवभोजन केंद्रावर एकाच थाळीसमोर अनेकांचे फोटो, घोटाळा उघड
बीड शहरातील एका शिवभोजन केंद्रामध्ये आज सकाळी एका टेबलवर एकच जेवणाची थाळी ठेवण्यात आली होती आणि त्या थाळीच्या समोर एका मागून एक व्यक्ती बसवून फोटो काढले जात होते. एका तरुणाने या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Jul 3, 2025
- 5:58 pm
बदलापुरात पर्यटकाला मस्ती अंगाशी
बदलापूर जवळील भोज धरणाच्या बंधाऱ्यातून निघणाऱ्या पाण्याशी मस्ती करणे एका पर्यटकाला चांगलंच अंगाशी आलं. या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या या तरुणाला त्याच्या सोबतच्या साथीदार आणि इतर पर्यटकांच्या मदतीने वाचवण्यात आलं. या व्यक्तीला इतर पर्यटकांच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
- भीमराव गवळी
- Updated on: Jul 3, 2025
- 5:36 pm
5 जुलै हा ब्लॅक डे… ठाकरेंच्या मोर्चावर सदावर्ते कडाडले
हिंदी सक्तीच्या विरोधी लढ्याला आलेलं यश म्हणून येत्या 5 जुलै रोजी ठाकरे बंधुंनी विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. वरळीत होणाऱ्या या विजयी मेळाव्याला मात्र प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र विरोध केला आहे. हा मेळावा म्हणजे माझ्यासाठी ब्लॅक डे आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Jul 3, 2025
- 2:11 pm
आजवरची विक्रमी ग्रीन एनर्जी निर्मिती, अदानी ग्रीनची कॅपेसिटी 15,000 मेगावॅटच्या पार
अदानी ग्रीन एनर्जीने (एजीईएल) 15,539.9 मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता गाठून विक्रम रचला आहे. यामध्ये 11,005.5 मेगावॅट सौर, 1,977.8 मेगावॅट वारा आणि 2,556.6 मेगावॅट वारा-सौर हायब्रिड क्षमता समाविष्ट आहे. हा भारतातील सर्वात वेगवान ग्रीन एनर्जी विकास आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Jun 30, 2025
- 11:28 am
राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय… अखेर हिंदी सक्तीचे जीआर रद्द
कॅबिनेटची मिटिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करण्यात येत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. तसेच डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली असून या समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Jun 29, 2025
- 7:46 pm
आजचे राशीभविष्य 29 June 2025 : आज कडाक्याचं भांडण होणार? पण कुणासोबत?; कुणाच्या राशीत येणार वादळ?
Horoscope Today 29 June 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.
- भीमराव गवळी
- Updated on: Jun 29, 2025
- 7:30 am
Shefali Jariwala Death : शेफाली जरीवाला किती शिकली होती? शिक्षण ऐकून आश्चर्य वाटेल
शेफाली जरीवालाचे अकस्मात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. "कांटा लगा" या गाण्याने प्रसिद्ध झालेली शेफाली उच्चशिक्षित होती, तिने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून एम.टेक (IT) केले होते. तिचे बालपण दार्जिलिंग येथे गेले, अभिनयाची इच्छा असतानाही तिने उच्च शिक्षण घेतले.
- भीमराव गवळी
- Updated on: Jun 28, 2025
- 11:45 am
Tata Ace Pro : प्रस्तुत करत आहे #AbMeriBaari भारतीय उद्योजकांच्या अतुलनीय उत्साहाच्या गौरवासाठी एक राष्ट्रव्यापी चळवळ
एका बाजूला एक थ्री-व्हीलर चालक आहे, जो आपल्या यशाचा सिलसिला कायम राखू इच्छितो. दुसऱ्या बाजूला एक डिलिव्हरी बॉय आहे, जो आपल्या कुटुंबासाठी चांगले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी एका बाजूला एक सुरक्षा रक्षक आहे, जो स्वतःचा व्यवसाय सुरू करून संधींचा लाभ घ्यायचा आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहेत.
- भीमराव गवळी
- Updated on: Jun 27, 2025
- 12:52 pm
महाकुंभनंतर अदानींची पुरी यात्रेत सेवा, लाखो भक्तांना मिळणार मोफत भोजनाचा लाभ
पुरीच्या रथयात्रेत अदानी ग्रुप 40 लाख भाविकांना मोफत जेवण आणि पाणी पुरवेल. महाकुंभानंतर ही अदानींची दुसरी मोठी सेवा आहे. स्वच्छता, आरोग्यसेवा आणि स्वयंसेवकांना साहित्य पुरवूनही मदत केली जात आहे. स्थानिक संस्था आणि प्रशासनाच्या सहकार्याने हे काम राबवले जात असून, हे सेवाभावनेतून केले जाणारे काम आहे असे अदानी समूह सांगतो.
- भीमराव गवळी
- Updated on: Jun 26, 2025
- 6:00 pm
आणीबाणीच्या काळ्या कालखंडावर… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन काय? पुस्तकात काय?
आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या काळातील संघर्षाचे वर्णन करणारे पुस्तक "द एमर्जन्सी डायरीज" प्रकाशित होत आहे. हे पुस्तक त्यांच्या आणीबाणीविरोधी संघर्षाचे वृत्तांत सांगते. मोदी यांनी आणीबाणीला संविधानाची हत्या म्हटले असून, या पुस्तकाद्वारे तरुण पिढीला या काळाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Jun 25, 2025
- 11:00 am