Communist Party Protest | भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चानं वातावरण तापलं, थोड्याच वेळात धडकणार पालघरच्या जिल्हाकारी कार्यालयावर
पालघरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. पाणी, जंगल, जमीन तसेच आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित एकूण १२ प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले असून, हातात लाल झेंडे घेत घोषणाबाजी करत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत.
पालघरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. पाणी, जंगल, जमीन तसेच आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित एकूण १२ प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले असून, हातात लाल झेंडे घेत घोषणाबाजी करत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या माध्यमातून पाणीटंचाई, वनहक्क, जमिनीचे प्रश्न, रोजगार, आरोग्य अशा मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी आणि कामगार वर्गाच्या प्रश्नांवर सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, हा मोर्चा लोकांच्या हक्कांसाठी असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

