AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price: गॅस दरवाढी पाठोपाठ पेट्रोल-डिझेलची भाव वाढ? पंप चालकांना त्या सूचना धडकल्या, मोठी अपडेट काय?

Petrol-Diesel Price Hike: घरगुती गॅस दरवाढीचा बॉम्ब आज सकाळी पडला. मध्य-पूर्वेतील युद्धाचा मोठा फटका आणि झळ बसली. गॅस दरवाढी पाठोपाठ पेट्रोल-डिझेलची भाव वाढ होईल का, याची पुन्हा भीती व्यक्त होत आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Petrol-Diesel Price: गॅस दरवाढी पाठोपाठ पेट्रोल-डिझेलची भाव वाढ? पंप चालकांना त्या सूचना धडकल्या, मोठी अपडेट काय?
पेट्रोल-डिझेल दरवाढ?Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 07, 2026 | 10:10 AM
Share

Petrol-Diesel Price Hike: इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाची धग संपूर्ण जगाला जाणवत आहे. तर भारताला या युद्धाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. आज सकाळीच घरगुती गॅस दरवाढीचा बॉम्ब पडला. मध्य-पूर्वेतील युद्धाचा मोठा फटका बसला आहे. घरगुती गॅस टंचाई रोखण्यासाठी आवश्यक वस्तू अधिनियम सरकारने लागू केला आहे. त्याचे परिणाम हॉटेलिंगवर होणार आहे. रेस्टॉरंटसह हॉटेल चालकांना त्याचा मोठा फटका बसेल. तर गॅसचा काळाबाजार होण्याची भीती ही वाढली आहे. दरम्यान ही घडामोड घडत असतानाच पेट्रोल-डिझेलची भाव वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. इंधन तुटवडा होणार नसला तरी गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेला इंधन दर यावेळी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात तेल उत्पादक कंपन्यांनी पंप चालकांनाही मोठ्या सूचना दिल्याने सर्वसामान्य नागरीक धास्तावले आहेत.

पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार?

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोल पंपावर सध्या धास्तीचे वातावरण आहे. अनेक पंप चालकांना कंपन्यांकडून आगाऊ रक्कम देण्याच्या सूचना धडकल्या आहेत. युद्धामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नाशिकमध्ये पेट्रोल 104.77 रुपये प्रति लिटर तर डिझेल 91.28 रुपये प्रति लिटर आहे.

कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ

मध्य-पूर्वेतील युद्धाचा मोठा फटका जागतिक तेल उत्पादनाला बसला आहे. इराणकडून कतार आणि इतर देशातील तेल रिफायनरीवर हल्ला झाल्याने तसेच होमूर्झचा समुद्रधुनी बंद होण्याची शक्यता लक्षात घेत कच्चा तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने तेजी दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसांची आकडेवारी तेच इंगित करत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. इंधन दर 85 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहचल्या आहेत. तर येत्या काही दिवसात हा दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

अगोदर आश्वासन नंतर घुमजाव

केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी नागरिकांना पुरेशा प्रमाणात तेल आणि गॅस साठा उपलब्ध असल्याचे आश्वासन दिले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती वाढल्या असल्या तरी भारतात तूर्तास दरवाढ होणार नाही असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले होते. पण एक रात्र उलटत नाही तोच केंद्र सरकारने घुमजाव केले. आज सकाळीच घरगुती गॅसच्या किंमतीत 60 रुपयांची दरवाढवण्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. अर्थात ही दरवाढ तात्पुरती असल्याची सारवासारव आता करण्यात येत आहे. लवकरच इतर देशांकडून नैसर्गिक गॅस खरेदी होऊ शकते. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. कारण पुरवठा साखळीवर सध्या मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आताही सरकार पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठा उपलब्ध असल्याचा दावा करत आहे. पण गॅस दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलचीही दरवाढ होण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. रशियाकडून भारताला पुढील 32 दिवस पेट्रोल-डिझेल खरेदी करता येणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...