गाणं पाहिजे तर असं, करवा चौथच्या दिवशी विवाहित महिलांसह अविवाहित मुली देखील याच गाण्यावर करतात डान्स
विवाहित महिलांसह अविवाहित मुली देखील करवा चौथच्या 25 वर्षांपूर्वीच्या या गाण्यावर करत आहेत डान्स. 5 गायकांनी गायलं होतं हे गाणं. आजही अनेकांचं आवडतं.

करवा चौथचा सण जवळ आला की विवाहित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला दिवसभर उपवास करतात आणि चंद्रदर्शनानंतर व्रत सोडतात. या सणाच्या तयारीदरम्यान बॉलिवूडमधील एका जुन्या गाण्याचीही चर्चा होत आहे. शाहरुख खान आणि काजोल यांच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील करवा चौथशी संबंधित गाणे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन आणि करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील कौटुंबिक वातावरण, पारंपरिक सण आणि भावनिक प्रसंग यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला.
पाच दिग्गज गायकांच्या आवाजाची जादू
या चित्रपटातील ‘बोले चूडियां’ हे गाणे करवा चौथच्या सणाशी जोडलेल्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. अलका याज्ञिक, अमित कुमार, कविता कृष्णमूर्ती, सोनू निगम आणि उदित नारायण या गायकांच्या आवाजाने या गाण्याला खास रंगत आणली. गाण्यातील नृत्य, पारंपरिक पोशाख आणि कुटुंबातील सदस्यांचा सहभाग यामुळे सणाचा आनंद अधिक खुलून दिसतो.
गाण्यात काजोल आणि शाहरुख खान यांच्यातील प्रेम तर हृतिक रोशन आणि करीना कपूर यांच्या नृत्यानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले. विवाहित जोडप्याच्या सुखी संसारासाठी दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा आणि नात्यांमधील प्रेमाचे दर्शन या गाण्यात घडते.
सासूच्या आशीर्वादाने खुलतो कौटुंबिक सोहळा
‘बोले चूडियां’ या गाण्यात पारंपरिक सण साजरा करताना कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. नवरा-बायकोच्या जोडीला आशीर्वाद देणे, प्रेम व्यक्त करणे आणि आनंदाने नृत्य करणे अशा प्रसंगांमुळे हे गाणे अधिक खास बनले आहे. त्यामुळे करवा चौथसारख्या सणांच्या निमित्ताने या गाण्याची आठवण आवर्जून काढली जाते.
काय आहे ‘कभी खुशी कभी गम’ची कथा?
करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात यशवर्धन रायचंद या श्रीमंत आणि परंपरावादी व्यावसायिकाच्या कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. त्याचा मोठा मुलगा राहुल (शाहरुख खान) अंजली (काजोल) हिच्या प्रेमात पडतो. मात्र, कुटुंबाच्या अपेक्षांमुळे राहुल घर सोडून परदेशात राहू लागतो. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ रोहन (हृतिक रोशन) कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो.
