AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Oct 23, 2026 | 2:24 PM
Share

मुंबईत बॉम्ब धमक्यांचे सत्र सुरू आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला आणि गायक दलजीत दोसांझ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. दादरमधील काही शाळा व महापौरांचे कार्यालयही लक्ष्य करण्यात आले. मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

मुंबईत पुन्हा एकदा बॉम्ब धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका ईमेलद्वारे मिळाली आहे. याव्यतिरिक्त, प्रसिद्ध गायक दलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टलाही ग्रेनेडने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

या धमक्या केवळ सेलिब्रिटींपर्यंतच मर्यादित नसून, दादरमधील काही प्रमुख शाळा आणि मुंबईच्या महापौर कार्यालयालाही अशाच पद्धतीचे धमकीचे ईमेल प्राप्त झाले आहेत. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाही केली आहे. माहिती मिळताच, एसओपीनुसार शहरातील विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. जलसा बंगल्याच्या परिसरात, संबंधित शाळांमध्ये आणि महापौर कार्यालयात बॉम्ब शोधक पथक तसेच श्वान पथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा आक्षेपार्ह बाब आढळलेली नाही. या धमक्या बोगस असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Published on: Oct 23, 2026 02:24 PM

Follow Us