AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली…; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Oct 23, 2026 | 4:31 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे पाटील यांनी कदम यांच्यावर शिंदे आणि फडणवीस यांना बदनाम करण्याचा कट रचल्याचा आरोप केला. मराठा समाजात गैरसमज पसरवून राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले. कदम हे क्रॅकजॅक संघटना असून, त्यांच्या पत्रकार परिषदेमागे शिंदे साहेबांची संमती नसल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला जरांगे पाटील यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांच्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. कदम हेच सर्व प्रकारच्या षडयंत्राचे मास्टरमाईंड असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. “शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावून ठेवली आहे. मराठ्यात गैरसमज जावा, शिंदे साहेबाला डॅमेज बसावं, हे काम हे स्वतः करत आहेत,” असे जरांगे पाटील म्हणाले.

कदम हे क्रॅकजॅक संघटना असून, त्यांनी जातीजातींमध्ये भिंती उभ्या केल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी फेटाळून लावला. आपली बदनामी करण्याचे तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कदम यांनी घेतलेली पत्रकार परिषद एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने नव्हती, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

 

Published on: Oct 23, 2026 04:31 PM

Follow Us