Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
कोल्हापूरच्या पन्हाळ्यामध्ये चुलत्याच्या घरी चोरी करत पुतण्याने चक्क थार गाडी खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुतण्या समर चव्हाणने चुलत्याच्या घरातून १५ तोळे सोने चोरले. या चोरीनंतर त्याने थार गाडी खरेदी केली. संशयावरून पोलिसांनी पुतण्याला आणि दागिने घेणाऱ्या सोनाराला अटक केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातून एक धक्कादायक चोरीचा प्रकार समोर आला आहे. पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात एका पुतण्याने आपल्या चुलत्याच्या घरी चोरी करत चक्क थार गाडी खरेदी केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुतण्या समर चव्हाण याने आपल्या चुलत्याच्या घरातून १५ तोळे सोन्याची चोरी केली होती. ही चोरी केल्यानंतर त्याने त्या पैशातून एक नवी थार गाडी खरेदी केली. विशेष म्हणजे, ज्या चुलत्याच्या घरातून चोरी झाली होती, त्याच चुलत्याच्या हस्ते या नवीन थार गाडीची पूजा करण्यात आली.
या चोरीप्रकरणी संशय आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, पुतण्या समर चव्हाण यानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पुतण्या समर चव्हाण याला ताब्यात घेतले आहे. तसेच, चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार संग्राम मोरे यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे नात्यांमधील विश्वासाला तडा गेल्याचे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Published on: Oct 23, 2026 05:10 PM
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड

