AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2026 : परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार

Maharashtra Budget 2026 : परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Mar 06, 2026 | 2:59 PM
Share

महाराष्ट्र बजेट 2026 अंतर्गत राज्यभरात अनेक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळाली आहे. यामध्ये सागरी सेतू, उन्नत मार्ग, मेट्रो, रेल्वे कॉरिडॉर आणि रस्ते विकासाचा समावेश आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये कनेक्टिविटी वाढवून राज्याला पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे.

महाराष्ट्र बजेट 2026 च्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईतील सिग्नल विरहित वाहतुकीसाठी शिवडी-वरळी उन्नत मार्ग सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, तर ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्गाला मान्यता मिळाली आहे. पुणे महानगर प्रदेशात मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या टप्पा दोनसह रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गालाही हिरवा कंदील मिळाला आहे.

राज्यात रेल्वे कॉरिडॉरचा विस्तार केला जात असून, मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीन ब अंतर्गत बदलापूर-कर्जत, आसनगाव-कसारा आणि पनवेल-वसई दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गीकेसाठी 5100 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र अमृत काल रस्ते विकास योजना 2025-47 अंतर्गत 6272 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग, 14919 किलोमीटरचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच 4247 किलोमीटरचे पर्यटन परिपथ विकसित करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पांमुळे राज्याची कनेक्टिविटी वाढून आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.

Published on: Mar 06, 2026 02:59 PM

Follow Us
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा