Washim | लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक; वाशीममध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव
वाशीम जिल्हयातील महिलांचा लाडकी बहीण हप्ता बंद झाल्यामुळे, महिलांनी आक्रोश व्यक्त केला आहे. याबात तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे वेळ मागितला होता, मात्र वारंवार विनंती करूनही जिल्हाधिकाऱ्यानी प्रत्यक्ष भेट नाकारल्यामुळे महिला आक्रमक झाल्या आणि जिल्हाधिकारांच्या गाडीला घेराव घालत जाहीर निषेध केलाय.
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली. ही योजना ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आला. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला जवळपास दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. पण नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका, त्यापोठापाठ म हपालिका निवडणुका या सगळ्यामुळे लाडकी बहीण योजनेता हाप्ता महिलांना मिळायला विलंब होत आहे. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला आहे.