लाडकी बहीण
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजने अंतर्गत 21 वर्ष ते 65 वर्षांपर्यंतच्या लाभधारक महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत झाला आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत जून 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत 2 कोटी 38 लाख लाभार्थी महिलांन तब्बल 17 हजार 505 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला गेला.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? 2100 मिळणार की नाही? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय तरी काय?
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार... नमो सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी होणार ही खोटी बातमी आहे. कोणत्याही महिलेचे पैसे कमी केले जाणार नाहीत, असेही मुश्रीफांनी स्पष्ट केलं.
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 19, 2025
- 1:08 pm
8 लाख लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये, कारण काय? अजितदादांनी नियम सांगितला..
राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. ही योजना लवकरच बंद होणार आहे, असा दावा विरोधक नेहमी करतात.
- Prajwal Dhage
- Updated on: Apr 15, 2025
- 9:09 pm
Ladki Bahin Yojana : ‘या’ महिलांना आता 1500 नाही तर 800 रूपयांचा हफ्ता येणार, लाडक्या बहिणींनो तुम्ही तर नाही ना यात? बघा…
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार असल्याचे समोर आले आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता ५०० रुपये मिळणार आहे,
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 15, 2025
- 7:12 pm
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… आता 1500 नाहीतर फक्त 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या, ‘सरकारकडून एप्रिल फूल…’
लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र अद्याप एप्रिल महिन्याचा 10 हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. अशातच आता आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 15, 2025
- 6:12 pm
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये
Ladki Bahin Yojana Installation Updates : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी फक्त 500 रुपये हप्ता दिला जाणार आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Apr 15, 2025
- 9:15 am
लाडकी बहीण योजनेत आठ लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार
Ladki Bahin Yojana Update : राज्य सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 15, 2025
- 9:13 am
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… एप्रिलचा हफ्ता अजून आला नाही? भुजबळांनी सांगितलं कधी येणार खात्यात पैसे
राज्यात सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, शिवभोजन योजना याचे देखील पैसे लाभार्थ्यांना दिले जातात. तर त्याचे देखील पैसे महिना दोन महिने उशिरा मिळतात. परंतु एवढे उशिरा मिळणार नाही, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 14, 2025
- 2:44 pm
लाडकी बहीण योजनेबद्दल अलका कुबल यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाल्या “महायुती सरकार..”
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांनी जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना 'लाडकी बहीण योजने'बद्दल मत मांडलं. त्याचप्रमाणे त्या विकी कौशलच्या 'छावा'बद्दलही मोकळेपणे व्यक्त झाल्या.
- स्वाती वेमूल
- Updated on: Apr 11, 2025
- 9:17 am
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज, मुंबईत मोठी फसवणूक, नेमकं काय घडलं?
मुंबईतील मानखुर्दमधील ६५ महिलांच्या नावांवर २० लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नेमकं काय घडलं बघा?
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 8, 2025
- 12:56 pm
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… एप्रिल महिन्याच्या हफ्त्याची वाट पाहताय? ‘या’ तारखेला येणार खात्यात पैसे
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, लाडकी बहीण योजनेचा हफ्ता प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला होणार असे सांगितलं गेले होते. मात्र एप्रिल महिन्याचा हफ्ता अद्याप आला नसल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 8, 2025
- 12:25 pm
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
Ladki Bahin Yojana Verification : लाडकी बहीण योजनेच्या पात्र आणि अपात्र लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात येणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. मात्र ही पडताळणी प्रक्रिया सध्या ठप्प पडलेली बघायला मिळत आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Apr 8, 2025
- 9:58 am
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, या तारखेला जमा होणार एप्रिलचा हप्ता, तारीख नोंद केली का?
जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
- manasi mande
- Updated on: Apr 8, 2025
- 9:15 am
Ladki Bahin Yojana : आता त्या महिलांना पण मिळणार पैसे, महायुतीच्या मंत्र्याने दिली योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता या योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Apr 4, 2025
- 6:15 pm
Pankaja Munde : ‘कुणी पैसे काढून घेत असेल तर…’, लाडक्या बहिणींना पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
जालन्यातील बदनापूर तालुक्यातील आन्वी गावात आश्रमशाळेच्या वसतीगृहाच्या भूमीपूजनासाठी पंकजा मुंडे आज आल्या होत्या. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले.
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 2, 2025
- 3:43 pm
Ajit Pawar : लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळणार की नाही? अजितदादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
बीडच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरूनही अजित पवार स्पष्ट बोलल्याचे पाहायला मिळाले. पीक कर्ज भरा असे म्हटल्यावर माझ्यावर काही जणांनी टीका केली. पण याबाबत मी जाहीरनाम्यात बोललो होतो, पण भाषणात कुठेही बोललो नव्हतो, असं दादा म्हणाले.
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 2, 2025
- 12:56 pm