AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ होणार , शिंदेंची मोठी घोषणा, रकमेचा आकडाही आला समोर

लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे, या योजनेंतर्गत सध्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ होणार , शिंदेंची मोठी घोषणा, रकमेचा आकडाही आला समोर
Ladki Bahin Yojana Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 02, 2026 | 5:50 PM
Share

सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती, या योजनेचा तत्कालीन महायुती सरकारला मोठा फायदा देखील झाल्याचं पहायला मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जर आमची राज्यात सत्ता आली तर आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ, असं अश्वासन त्यावेळी महायुतीच्या काही नेत्यांकडून देण्यात आलं होतं, मात्र आता सरकार सत्तेत येऊन दीड वर्ष होत आलं, तरी देखील लाडक्या बहिणींच्या सन्मन निधीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आता या योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना मोठी घोषणा केली आहे.

त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे हे यापूर्वी देखील एक दोनदा यासंदर्भात बोलले होते, लाडक्या बहिणींचा सन्मान निधी आम्ही 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे, आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये वाढ करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींंना मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?  

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, या योजनेला कोणीही थांबवू शकत नाही. सत्ता येते जाते, पण नाव गेले की परत येत नाही, असे बाळासाहेब ठाकरे सांगायचे. पैसा संपत्तीपेक्षा मी किती तरी माणसांचे प्रेम कमावले आहे, हे मला महत्त्वाचे आहे. मी दिलेला शब्द पाळणारा आणि जगणारा आहे. हे महाराष्ट्रातच्या मनातील सरकार आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लखपती करणार आहोत.  आम्ही 2100 रुपये देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण करणार आहोत, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय दखील आम्ही योग्यवेळी घेऊ असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?