NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत…
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या "गुंगी गुडिया" या टिप्पणीवरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात प्रवेश करून तीव्र निषेध नोंदवला.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या “गुंगी गुडिया” या टिप्पणीवरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात प्रवेश करून तीव्र निषेध नोंदवला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी काँग्रेसकडे माफीची मागणी केली. “काँग्रेसच्या अधिकृत एक्स (X) पोस्टवरून सुनेत्रा पवार यांचा अपमान करण्यात आला आहे. आमचा वाद काँग्रेस पक्षाशी नाही, मात्र संबंधित पोस्ट करणाऱ्याविरोधात आमचे आंदोलन आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
सूरज चव्हाण यांनी पुढे काँग्रेसवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला. “एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे एका महिला उपमुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे. ‘दुर्गा व्हा’ असे सांगताना त्याच दुर्गेचा अपमान करण्याचे काम काँग्रेस करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
सुनेत्रा पवार विविध प्रश्नांवर बोलत नसल्याच्या काँग्रेसच्या आरोपांनाही त्यांनी फेटाळले. “सुनेत्रा पवार यांनी सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडली आहे. काँग्रेसच्या नेत्यांना ती ऐकू येत नसेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. आपल्या सोयीचे आणि राजकीय फायद्याचे ट्वीट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली.
हर्षवर्धन सपकाळ यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, असा इशाराही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला. “महिलेला कमी लेखणे ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का, याचे उत्तर त्यांनी द्यावे. आम्ही चर्चा करण्यासाठी आलो आहोत. आता ते चर्चा करतात की टाळाटाळ करतात, हे पाहायचे आहे,” असे सूरज चव्हाण म्हणाले.
दरम्यान, इंदिरा गांधींचा उल्लेख करत सूरज चव्हाण यांनी सांगितले की, “काँग्रेसला कदाचित स्वतःच्या इतिहासाचा विसर पडला आहे. इंदिरा गांधींनी इतिहास घडवला होता, त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारही भविष्यात इतिहास घडवतील. महिलेचा अपमान करणारी मानसिकता काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट दिसून आली असून, त्याचा जाब विचारण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Published on: Aug 04, 2026 04:12 PM
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा...
ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार...

