AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जंतरमंतरवाल्या इरफान मोहम्मदला 24 तासात 70000 सब्सक्रायबर, लगेच युट्यूब बंद; त्यानंतर…

Mohammad Irfan : कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या मोहम्मद इरफान यांनी यूट्यूब चॅनेल सुरू केले होते. मात्र त्यांचे चॅनेल बंद करण्यात आले आहे.

जंतरमंतरवाल्या इरफान मोहम्मदला 24 तासात 70000 सब्सक्रायबर, लगेच युट्यूब बंद; त्यानंतर...
Md Irfan CJPImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 04, 2026 | 10:36 PM
Share

कॉकरोज जनता पार्टीचे राजधानी दिल्लीतील आंदोलन देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या मोहम्मद इरफान यांनी यूट्यूब चॅनेल सुरू केले होते. इरफान यांच्या चॅनेलला अवघ्या 24 तासांत 70 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स मिळाले होते. मात्र आता त्यांचे यूट्यूब चॅनेल अचानक बंद करण्यात आले आहे. यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. इरफान यांचे चॅनेल नेमकं का बंद करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

CJP च्या आंदोलनादरम्यान भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना वाचल्यामुळे मोहम्मद इरफान हे एका रात्रीत चर्चेत आले होते. यानंतर त्यांनी एक युट्यूब चॅनेल सुरु केले होते. या चॅनेलला अवघ्या 24 तासांत 70 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स मिळाले होते. मात्र आता यूट्यूबने सेवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत चॅनेल बंद केले असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर इंटरनेटवर अनेकांनी इरफान यांचे चॅनेल तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

मोहम्मद इरफान चर्चेत कसे आले?

मोहम्मद इरफान हे काही दिवसांपूर्वी जंतर-मंतर येथे झालेल्या CJP आंदोलनादरम्यान भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना वाचल्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. झोपडपट्टीत राहूनही त्यांनी मजुरांचे प्रश्न, स्वस्त शिक्षण, आरोग्यसेवा आणि लोकशाही हक्कांबाबत स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. त्यांच्या विचारांची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या विचारांचे कौतुकही केले होते.

चॅनेल बंद झाल्यानंतर इरफान काय म्हणाले?

समोर आलेल्या माहितीनुसार इरफान यांनी ‘मैं इरफान’ या नावाने यूट्यूब चॅनेल सुरू केले होते. मात्र, केवळ 24 तासांतच त्यांना गुगलच्या सेवा अटींचे उल्लंघन झाल्याचा संदेश मिळाला आणि चॅनेल बंद करण्यात आले आहे. यावर इरफान यांनी X वर पोस्ट करून सांगितले की, मी यूट्यूबच्या सर्व नियमांचे प्रामाणिकपणे पालन केले आहे. मात्र चॅनेल तसेच ही कारवाई ऑटोमेटेड प्रणालीतील तांत्रिक त्रुटीमुळे झाली असण्याची शक्यता आहे. त्यांनी यूट्यूबला आपल्या चॅनेलची फेरतपासणी करून ते लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे.

इंटरनेटवरून मोठा पाठिंबा

इरफान यांचे चॅनेल बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला असून, यूट्यूबने त्यांचे खाते तातडीने पुन्हा सुरू करावे, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात पत्रकार अजित अंजुम यांनीही X वर पोस्ट करत म्हटले की, ‘मजूर वर्गातील एका तरुणाने एका दिवसात 70 हजार सबस्क्राइबर्स मिळवणे ही मोठी कामगिरी आहे.’ तसेच अनेकांनी यूट्यूबने आपली चूक दुरुस्त करावी आणि लोकांचा आवाज दाबू नये, अशी मागणी केली आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं