AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone: भारताच्या कोणत्या भागात येतात सर्वाधिक चक्रीवादळे, कुठे आहे धोका ?

Cyclone Risk in India: मुरसु नावाच्या चक्रीवादळाने आंध्रात थैमान घातले आहे. देशाच्या कोणत्या भागात सर्वाधिक चक्रीवादळे तयार होतात याची माहिती घेऊयात...

Cyclone: भारताच्या कोणत्या भागात येतात सर्वाधिक चक्रीवादळे, कुठे आहे धोका ?
Cyclone
| Updated on: Nov 03, 2026 | 11:29 PM
Share

Cyclone Risk in India: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री एक वाजता मुरसु नावाचे भयंकर चक्रीवादळ आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोलच्या किनाऱ्यावर गेले आहे. बंगालची खाडीच्या पश्चिम मध्य भागात तयार झालेले हे चक्रीवादळ राज्याच्या दक्षिण तटाच्या जवळ पोहचले होते. जसे या चक्रीवादळाने किनाऱ्या ओलांडण्यास सुरुवात केली याच्या आयवॉलचा पुढचा भाग जमीनीच्या वर आला आणि चक्रीवादळाचे केंद्र किनाऱ्याला धडकले. हे चक्रीवादळ ओंगोलहून सुमारे ४० किमी दक्षिण पूर्व कावली ६० किलोमीटर उत्तर पूर्व आणि बापटलाहून ७० किमी दक्षिण किनाऱ्यावर धडकले आहे.

पूर्व किनाऱ्याला सर्वाधिक धोका

भारताच्या पूर्व किनारपट्टी राज्ये ओडीसा, आंध्रप्रदेश,पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू नेहमीच चक्रीवादळाच्या माऱ्याच्या आत येतो. हवामान खात्याच्या आकड्यांनुसार भारतात दरवर्षी सरासरी २ ते ४ ट्रॉपिकल सायक्लॉन येतात. यात बहुतांशी बंगालच्या खाडीत तयार होतात आणि पूर्व किनाऱ्याला धडकतात.

भारताला प्रभावित करणारे सुमारे ८० टक्के चक्रीवादळे बंगालच्या खाडीत तयार होतात आणि पूर्व किनाऱ्याला जमीनीशी धडकतात. यामुळे हा भाग देशच्या मुख्य चक्रीवादळाचे जोखीम क्षेत्र बनले आहे. नोव्हेंबर २०२६ च्या सुरुवातीला मुरसु चक्रीवादळाने आंध्रप्रदेश आणि ओडीसाच्या किनारपट्टीवर मोठे नुकसान केले आहे. यामुळे पूरजन्य स्थिती आणि वादळी पाऊसही येतो.

ओडीसा खासकरुन चक्रीवादळे आणि वीज कोसळण्याच्या घटनाप्रती संवेदनशील आहे. खराब मोसमात याच्या किनारी जिल्ह्यांना खूप मोठ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. आंध्रप्रदेश हे देखील एक जोखीम वाले राज्य आहे. नेल्लोर, नरसापूर आणि प्रकाशम जिल्ह्या सहीत याचा दक्षिण किनारा संवदेशनशील मानला जातो. मुरसुच्या प्रभावाने या किनारपट्टीला किती नुकसान होते याची प्रचिती आली आहे.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूला वारंवार अशा धोक्यांचा सामना करावा लागतो. पश्चिम बंगालच्या सुंदरबन आणि उत्तर तामिळनाडूतील किनारी जिल्हे नेहमीच चक्रीवादळाच्या रेड झोनमध्ये येतात. बंगालची खाडीपासून किनारा असल्याने हे क्षेत्र खाडीत तयार होणाऱ्या चक्रीवादळाच्या मध्ये येते.

अरबी समुद्र किनारी धोका कमी

भारताच्या पश्चिम किनारपट्टीची तुलना चक्रवातांशी टक्कर होण्याची घटना फार कमी असते. बंगालच्या खाडीच्या तुलनेत अरबी समुद्रात चक्रीवादळे कमी होतात. ऐतिहासिक दृष्ट्या दर दोन ते चार चक्रीवादळापैकी केवळ एकच पश्चिम किनाऱ्याच्या दिशेने पुढे सरकते.

गुजरात आणि महाराष्ट्र अशी पश्चिम राज्य आहेत ज्यांच्या प्रभावित होण्याचा धोका जास्त असतो. पश्चिम तटीय राज्यात केव्हा केव्हा गंभीर मौसमी प्रणालीचा परिणाम पाहायला मिळतो. गुजरातचा कच्छ आणि सौराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीत खास करुन जोखीम असते. जेव्हा चक्रीवादळ किनाऱ्याच्या जवळ येते किंवा किनारा ओलांडते. तेव्हा या क्षेत्रात वेगाने वारे वाहू लागतात आणि मोठा पाऊस कोसळतो. गोवा,कर्नाटक आणि केरळात चक्रीवादळ थेट किनाऱ्याला टक्कर देण्याची शक्यता कमी असते. मात्र,जेव्हा कोणतेही चक्रीवादळ यांच्याजवळून जाते, तेव्हा या राज्यालाही मोठ्या अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा सामना करावा लागतो.

देशाच्या अंतर्गत भागापर्यंत परिणाम

चक्रीवादळाचा परिणाम केवळ किनारपट्टीपुरता मर्यादित नसतो. किनारपट्टीवर धडकल्यानंतर वारे कमकुवत झाले तरी, त्याचे अवशेष देशाच्या अंतर्गत भागात पुढे सरकत राहू शकतात आणि तीव्र हवामान निर्माण करू शकतात. मुसळधार पाऊस, पूर आणि वादळे यांचा परिणाम किनारपट्टीपासून दूर असलेल्या राज्यांवर होऊ शकतो.

देशांतर्गत भागात, छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश या भागांवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा एखादी कमकुवत चक्रीवादळी प्रणाली देशाच्या अंतर्गत भागात प्रवेश करते, तेव्हा या भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळे येऊ शकतात.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले