AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Drought: अल निनोचा शेतीला फटका बसण्याची शक्यता! भातसा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळणार नाही? शासनानं दिली मोठी अपडेट

El Nino Raises Drought Concerns in Maharashtra: रब्बी हंगामावर पाणीटंचाईचं सावट आहे. यामुळे भातसा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून न राहण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

Maharashtra Drought: अल निनोचा शेतीला फटका बसण्याची शक्यता! भातसा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळणार नाही? शासनानं दिली मोठी अपडेट
No Irrigation Water Expected From Bhatsa Dam for Rabi Crops
| Updated on: Nov 03, 2026 | 10:52 PM
Share

महाराष्ट्रातील 85% तालुक्यांमध्ये आणि गुजरात, राजस्थान व तेलंगणाच्या काही भागांमध्ये आता दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करणारे टँकर दुर्गम भागांमध्ये पसरले आहेत. अल निनोच्या पार्श्वभूमीवर भातसा धरणाच्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामी पिके लागवड करू नये, असं शासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

भातसा कालव्याच्या पाण्यावर विसंबून न राहता जमिनीतील ओलाव्याचा आणि खाजगी जलस्त्रोतांचा अंदाज घेऊनच कमी पाण्यातील कडधान्ये आणि तेलबिया पिकांचे सूक्ष्म नियोजन करावे, असं आवाहन सरकारने शेतकऱ्यांना केले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहापूरमधील भातसा धरणातून रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

शासनाच्या नवीन पाणी व्यवस्थापन नियमांनुसार, 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. 10टक्के आपत्कालीन बफर साठा राखीव ठेवला जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना अधिक पाण्याच्या रब्बी पिकांची लागवड न करण्याचे किंवा लागवड टाळण्याचे आवाहन केले आहे. भातसा धरणाच्या कालव्यातून पाणी मिळण्याची शाश्वती नसल्याने जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी पाण्यावर येणाऱ्या व जमिनीतील ओलाव्यावर टिकणाऱ्या पिकांची निवड करा, असं सांगण्यात आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने कडधान्ये, हरभरा, मूग, उडीद किंवा मटकीची निवड करा. तसेच गळीत धान्यांमध्ये जवस, मोहरी, करडई किंवा तीळाचे पीकस घ्या. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये म्हणून कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारी किंवा बाजरी यांसारख्या चारा पिकांची लागवड करता येईल. शेतातील किंवा गावातील उपलब्ध पाण्याचा अंदाज घ्या. उपलब्ध ओलाव्यानुसारच पेरणीचे क्षेत्र निश्चित करा. पाण्याचा साठा कमी असल्यास विनाकारण जास्त क्षेत्रावर पेरणी करू नका, असं आवाहन सरकारने केले आहे.

जमिनीत जोपर्यंत पुरेसा ओलावा उपलब्ध आहे. तोपर्यंतच रब्बीची पेरणी पूर्ण करून घ्या. पेरणी करताना बियाणे योग्य खोलीवर पडेल याची काळजी घ्या. पिकांची घनता मर्यादित ठेवा. जास्त दाट पीक घेतल्यास उपलब्ध ओलावा आणि अन्नद्रव्यांसाठी पिकांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन उत्पादन घटू शकते. हवामानातील अनिश्चितता आणि पाण्याचे संकट पाहता नुकसान सोसावे लागू नये म्हणून शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा काढून आपली पिके सुरक्षित करून घ्यावीत, असं सरकारकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले